पन्नास वर्षे सत्ता राखलीत हे बॅलटपेपरचे श्रेय आहे का ? लाड यांचा सवाल | Prasad Lad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasad lad

पन्नास वर्षे सत्ता राखलीत हे बॅलटपेपरचे श्रेय आहे का ? लाड यांचा सवाल

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : काँग्रेसने (congress) स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षेतरी ( 50 years ruling party) देशावर एकहाती सत्ता राबवली, याचे रहस्य बॅलटपेपरवरील निवडणुका (Ballot Paper election) हेच आहे का, असा प्रश्न भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना विचारला आहे.

हेही वाचा: मोखाडा : जव्हार मधील जुन्या पोलीस वसाहतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

हिंमत असेल तर भाजपने केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलटपेपरवर निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान पटोले यांनी काल भाजपला दिले होते. त्याला लाड यांनी उत्तर देताना, काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अविश्वास दाखवणे म्हणजे मतदारांवर अविश्वास दाखवून त्यांचा अपमान करण्यासारखेच आहे, असा टोलाही लगावला आहे. काँग्रेसला देशातील लोकशाहीची ताकद अजून कळलीच नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा: मुंबई NCB ची धडाकेबाज कारवाई; वकिलाची एमडी ड्रगची फॅक्टरी उद्ध्वस्त

काँग्रेसने पन्नास वर्षे देशावर निरंकुश व मोठ्या बहुमताने सत्ता राबवली याचे कारण बॅलटपेपरवर मतदान घेताना त्यांनी केलेला गैरप्रकार हेच आहे. ग्रामीण भागात मतदानकेंद्रे ताब्यात घेऊन, मतपत्रिकांवर आपले शिक्के मारून विजय मिळवण्याचे तंत्र त्यांना चांगलेच जमले होते. मात्र इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे आल्यावरच काँग्रेसची सत्ता डळमळीत झाली हा योगायोग नक्कीच नाही. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांमध्ये बोगस व्होटिंग करणे सोपे नसल्याने काँग्रेसने पहिल्यापासूनच त्यांना विरोध केला, हे सत्य असल्याचेही लाड म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांना काँग्रेसचा विरोध असण्याचे कारण म्हणजे या यंत्रांमध्ये भाजप तांत्रिक फेरफार करून निकाल आपल्या बाजूने लावते, असा काँग्रेसजनांचा आवडता आरोप आहे. मात्र काँग्रेसचे मनमोहनसिंह पंतप्रधान असतानाच सर्वप्रथम सन 2014 च्या निवडणुकीत भाजपला केंद्रात दणदणीत बहुमत मिळाले होते. काँग्रेसची देशभर सत्ता असताना भाजपने एकाचवेळी या हजारो मतदानयंत्रांमध्ये तांत्रिक घुसखोरी केली, असा काँग्रेसजनांचा आरोप असेल, तर देशाची सत्ता सांभाळण्यास काँग्रेस किती असमर्थ आहे, हेच ती मंडळी दाखवून देत आहेत.

अशा शब्दांत लाड यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. केव्हाही आणि कशाही प्रकारे निवडणुका झाल्या तरी त्या जिंकण्याची ताकद भाजपमध्ये आहे. मात्र देशाचे तंत्रज्ञान सुरक्षित ठेऊ न शकणाऱ्या काँग्रेसने देशाच्या भल्यासाठी पुन्हा सत्तेवर न येण्याचा दृढनिश्चय करावा, असेही लाड यांनी सुनावले आहे.

loading image
go to top