
मुंबई : ‘राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार करून चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली. यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे प्रदेश काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.