congress party
sakal
मुंबई : स्थानिक पातळीवरील पक्ष मजबुतीसाठी काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल सुरु केले असून बुधवारी राज्यातील ६९ नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. काँग्रेसने दिल्लीतून पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. या यादीत जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करून काँग्रेसने संघटनेची घडी बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे.