esakal | हा तर निर्लज्जपणाचा कळस; काँग्रेसची टीका 
sakal

बोलून बातमी शोधा

congress leader ahmed patel press conference after devendra fadnavis ajit pawar oath ceremony

अहमद पटेल म्हणाले, 'बँड बाजा बराती शिवाय ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली गेली, त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासात हा दिवस काळ्या अक्षरांनी लिहिला आहे.'

हा तर निर्लज्जपणाचा कळस; काँग्रेसची टीका 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : काँग्रेसकडून पाठिंबा देण्यास कोणताही विरोध झालेली नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईत चर्चेला दाखल झालो. आमच्याकडून कोणताही निर्णय घेण्यास उशीर झाला नाही. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठीही धक्का आहे. पण, आज सकाळी जे कांड घडले आहे ते निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची आज, बैठक झाली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

डाऊनलोड करा सकाळचे एप

अहमद पटेल म्हणाले, 'बँड बाजा बराती शिवाय ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली गेली, त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासात हा दिवस काळ्या अक्षरांनी लिहिला आहे. यादी दिली त्याचं खात्री करून न घेता ज्या पद्धतीनं हा शपथविधी झाला. त्यावरून काही तरी चुकीचं झाल्याचा वास येतो. यातून लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या गेल्याचं स्पष्ट होतंय. यांनी तर, निर्लज्जपणाचा कळस केला. आम्ही राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवली. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही शिवसेनेसोबत चर्चा करत होतो. दोन दिवसांत तिन्ही पक्षांमध्ये खूपच चांगली चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आज आम्ही पुन्हा बैठक घेणार होतो. पण, आज सकाळी जे कांड झाले ते निश्चितच लज्जास्पद आहे.' काँग्रेसने पाठिंबा देण्यास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. त्यात तथ्य नसल्याचं अहमद पटेल यांनी या वेळी स्पष्ट केलं. 

आणखी बातमी वाचा - अजित पवार मुर्दाबाद कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

आणखी बातमी वाचा - पवार कुटुंंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले

पटेल म्हणाले, 'अजित पवार यांच्याविषयी शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा झाली आहे. त्यात अजित पवार यांच्यावर कारवाई करण्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतील. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. काँग्रेस निर्णय घेण्यास उशीर केला म्हणून नाही तर, राष्ट्रवादीचा एक गट फुटल्याने हा पेच निर्माण झालाय.' शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने अजूनही सरकार स्थापन करू, असा दावा अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला.