ठाणे - विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते तथा माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीच्या निकालानंतर चोवीस तासात त्यांनी शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केल्याची घोषणा जन्मदिनाच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज शिंदे यांनी केली.