

Congress party leader in kalyan will join shinde Shivsena
ESakal
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यातच कल्याण मधील काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक आणि नेता शिवसेना शिंदे गटात बुधवारी प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. मागील अनेक दिवसांपासून हा गट शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गुप्त भेटीगाठी घेत असल्याची माहिती समोर आली होती. हवे तसे वजन मिळत नसल्याने हा प्रवेश रखडला होता मात्र अखेर आता हा गट शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहेत.