'भाजप-शिंदेसेना सत्तेसाठी एकत्र, मुंबईकरांशी त्यांना देणेघेणे नाही' काँग्रेस प्रवक्त्यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

Sureshchandra Rajhans : भाजप-शिंदेसेना सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असे म्हणत काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
Sureshchandra Rajhans

Sureshchandra Rajhans

ESakal

Updated on

मुंबई : ‘मुंबई महापालिका सध्या भ्रष्टाचाराचे कुरण बनली असून, सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये केवळ ‘मलई’ खाण्यावरून वाद सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासक राजवटीत मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशांवर दरोडा टाकण्यात आला असून, आता १,००० कोटींचे कंत्राट रद्द झाल्यामुळे काँग्रेसने केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे; मात्र केवळ कंत्राट रद्द करून चालणार नाही, तर या भ्रष्टाचाराच्या दलदलीत सामील असलेल्या अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा,’ अशी मागणी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी शनिवारी (ता. ४) केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com