Mumbai: मुंबईत डोळ्यांच्या साथीचा शिरकाव, 'ही' लक्षणे जाणवल्यास लगेच घ्या डॉक्टरांचा सल्ला

डोळ्यांची ही लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा
Conjuctivities
Conjuctivitiesesakal

Conjuctivities in Mumbai: मुंबईत सध्या डोळे येण्याची साथ पसरली असून बीएमसीने मुंबईकरांना लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत मागील दोन आठवड्यांपासून नेत्र संसर्गाने अनेक रूग्ण त्रस्त आहेत. महानगरपालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील 15 दिवसांत सुमारे 250 ते 300 नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे नेत्र संसर्गाचं गांभीर्य लक्षात घेता आता मुंबई महापालिकेमार्फत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

कशी उद्भवते डोळ्यांची साथ

पावसाळ्यात हवेतील दमटपणा हा संसर्गजन्य रोगांसाठी पोषक ठरत असतो. त्यामुळे दरवर्षी या काळात डोळ्याच्या साथीचा धोका उद्भवतो. नेत्र संसर्गाच्या साथीमध्ये सुरूवातीला एका डोळ्याला संसर्ग होतो, नंतर दुसऱ्या डोळ्यालादेखील संसर्ग होतो.

काय आहे नेत्रसंसर्गाची लक्षणे

डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटणे

सतत डोळ्यांतून पाणी येणे

डोळे लाल होणे

डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडणे

डोळ्यांच्या आतील बाजूस सूज येणे

डोळ्यांना खाज येणे

डोळे जड वाटणे आणि तीव्र प्रकाश सहन न होणे

Conjuctivities
Dry eye disease : स्क्रिन करतोय मुलांचे डोळे कोरडे

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?

- डोळे आले असल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये.

- डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धुत राहावे.

- डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करु नये.

- कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे/सुरक्षित अंतर राखून राहावे.

- कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय करू नका, वैद्यकीय तज्ञांचा/नेत्र उपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानेच उपचार आणि औषधे घ्यावीत.

- योग्य वेळेवर उपचार घेतल्यावर 5 ते 6 दिवसांत डोळे बरे होतात.

- एकदा डोळे येऊन गेले की, परत त्या व्यक्तीला संसर्ग होण्याचाही धोका असतो. तेव्हा निष्काळजीपणा करू नये.

- मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य निदान आणि उपचार पुरवले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com