नवी मुंबईत लॉकडाऊनमध्ये नागरिकांना दिलासा, सिडकोच्या वाढीव पाणीदरांना स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातील पाणी पनवेल तालुक्यातील गावांना दिले जाते. सिडकोच्या हद्दीत येणाऱ्या खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे आणि काळूंद्रे भागातील रहिवासी, वाणिज्य, व्यावसायिक आणि सामाजिक वापरासाठी हा पाणी पुरवठा केला जातो.

नवी मुंबई : सिडकोतर्फे दक्षिण नवी मुंबईच्या परिसरातील शहरे आणि ग्रामपंचायतींना पुरवठा केला जाणाऱ्या पाण्याचे दर वाढवण्यात आले होते. परंतु आता या वाढीव दरांवर सिडकोने सहा महिन्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातील पाणी पनवेल तालुक्यातील गावांना दिले जाते. सिडकोच्या हद्दीत येणाऱ्या खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे आणि काळूंद्रे भागातील रहिवासी, वाणिज्य, व्यावसायिक आणि सामाजिक वापरासाठी हा पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या 15 वर्षांपासून पाणी दरात वाढ करण्यात आली नव्हती. जुन्या दरानेच आत्तापर्यंत पाणी देयके आकारले जात होते.

नक्की वाचा : मुलांनो तयारीला लागा! 'या' दिवसापासून शाळा सुरु होण्याची शक्यता

अचानक कोरोनाच्या साथीमुळे सरकारला लॉकडाऊन घोषित करावा लागला. गेल्या मार्च महिन्यांपासून सुरू असणारा लॉकडाऊन तीन महिन्यांपासून सुरूच आहे. आता चौथा लॉकडाऊन 30 मे रोजी संपणार आहे. परंतु त्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी चिन्ह कमी आहेत. त्यामुळे संभाव्य लॉकडाऊनची दाट शक्यता आहे. या परिस्थितीत उद्योग धंदे बंद होऊन अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. तर अनेकांवर पगार कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. नागरिक आर्थिक संकटात सापडल्याने वाढीव दरानुसार पाणी बिल भरणे या परिस्थितीत नागरिकांना शक्य नाही. त्यामुळे सिडकोने लागू केलेल्या वाढीव पाणीदरांना सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. पुढील परिस्थिती सुधारेपर्यंत नव्या दराऐवजी जुन्या दरांनी पाणी बिल आकारले जाईल, असे सिडकोतर्फे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी सांगितले. त्यामुळे सिडकोने स्थगिती दिल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचाआम्ही 'पॅकेज'च्या जाहिराती करत नाही; आम्ही कामं करतोय : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

10 ते 15 टक्क्यांनी वाढ
धरणातील पाणी खेचून आणण्यासाठी लागणार खर्च, पाणी पुरवठ्याचा खर्च, देखभाल दुरुस्तीचा खर्च काढणे मुश्किल पडत असल्याचे कारण पुढे करून मार्च महिन्यात पाण्याच्या दरात प्रत्येकी 10 ते 15 टक्क्यांनी वाढ केली होती.

Consolation to citizens in lockdown in Navi Mumbai, suspension of CIDCO's increased water rates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consolation to citizens in lockdown in Navi Mumbai, suspension of CIDCO's increased water rates