
वरळीत हिट अँड रन प्रकरणामुळे चर्चेत आलेले राजेश शहा यांना शिवसेना शिंदे गटानं पक्षातून निलंबित केलं होतं. आता पुन्हा पक्षाच्या कार्यक्रमात थेट व्यासपीठावर स्थान देण्यात आलंय. तर खंडणीप्रकरणातील आरोपी असलेल्या स्वप्नील बांदेकर यांना पक्षात घेण्यात आलंय. शिवसेना शिंदे गटाच्या या कार्यक्रमाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.