'ही' एक सवय सोडली नाही तर आपल्याकडेही कोरोनाचा हाहाकार अटळ...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

 कितीही काळजी घेतली तरी जोपर्यंत भारतीय त्यांची कुठेही थुंकण्याची सवय सोडत नाहीत तोपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होणार नाही असा डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.

मुंबई: जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांची अस्वच्छता आणि वाईट सवयी. चीनमध्ये लोकांना वटवाघूळ खाण्याची सवय असल्यामुळे वटवाघुळांच्या शरीरातून कोरोना मानवी शरीरात आला असं सांगण्यात येतंय. त्यांच्या वाईट सवयीमुळे जगभरात कोरोना व्हायरस पसरला. मात्र आता भारतीयांची अशीच एक सवय आपल्याला महागात पडण्याची शक्यता आहे. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन करा. तसंच नेहमी स्वच्छतेचं पालन करा असं संगणयत येतंय. विशेष म्हणजे अशा काही गोष्टींचं पालन लोकांकडून केलंही जातंय. मात्र कितीही काळजी घेतली तरी जोपर्यंत भारतीय त्यांची कुठेही थुंकण्याची सवय सोडत नाहीत तोपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होणार नाही असा डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. 

सावधान! कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांमध्ये आढळून येतायत ''ही'' लक्षणं.. 

भारतात बहुतांश लोकांना रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय आहे आणि हीच सवय पुढे जाऊन कोरोनाच्या हाहाकारचं कारण बनू शकते. कोरोना बाधित व्यक्ती जर  सार्वजनिक ठिकाणी थुंकत असेल तर त्याच्या थुंकीमुळे तब्बल २४ तासांपर्यंत  इतर लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी धक्कादायक माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. 

जेव्हा कुठला कोरोनाबाधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकतो त्यावेळी त्याच्या तोंडातून थुंकीसोबत विषाणू बाहेर पडतात. जेव्हा कोणी व्यक्ती या थुंकीजवळून जातो तेव्हा त्याच्या शरीरात या थुंकीतले विषाणू प्रवेश करतात. यामुळे त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. 

जर तुम्हाला थुंकण्याची गरज वाटत असेल तर हे करा:

  • थुंकण्याची गरज वाटल्यास इतरांपासून दूर जा. 
  • स्वतःजवळ टिशू पेपर बाळगा. 
  • थुंकण्याची गरज पडली तर त्या टिशू पेपरमध्ये थुंका. 
  • त्यानंतर हा टिशू पेपर नीट गुंडाळून कचरा पेटीत टाका. 
  • थुंकताना कुणीही आजूबाजूला नसेल याची काळजी घ्या. 
  • सर्दी किंवा कफ असेल तर घराबाहेर पडू नका. 

हेही वाचा: सोनाली कुलकर्णी आपल्या वाढदिवशी देणार हे मोठं गिफ्ट.. 

जर तुमच्या समोर कोणी थुंकलं तर हे करा: 

  • त्या व्यक्तीनं थुंकलेल्या जागेजवळ जाऊ नका. 
  • थुंकलेल्या ठिकाणी स्पर्श करू नका. 
  • जर तुमच्या अंगावर कोणाची थुंकी पडली असेल तर लगेच कपडे बदला. 
  • वाहेरून आल्यानंतर नेहमी आपले कपडे गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. 

सरकारनं याआधीही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये म्हणून नागरिकांना आवाहन केलं आहे. मात्र काही लोकं ऐकण्याच्या मानसिकतेत अजूनही नाहीत. मात्र जर ही सवय लोकांनी लवकर बंद केली नाही तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर यायला वेळ लागणार नाही.

corona affects more if Indians wil not giveup their habbit of spiting anywhere read full story  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona affects more if Indians wil not giveup their habbit of spiting anywhere read full story