मुंबईत कोरोना आटोक्यात! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईत कोरोना आटोक्यात! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोना आटोक्यात आला आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या आता 300 वर आली आहे. नवीन रुग्णांची संख्या कमी होत असताना, कोरोनामधून बरे होऊन रुग्णालयातून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत दर तासाला 19  टक्क्यांहून अधिक रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात येत आहे. दर तासाला सरासरी 13 नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्या तुलनेत दर तासाला 16 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येत आहे.

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. दिवाळीनंतर रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा होती, मात्र दिलासादायक बाब म्हणजे नवीन रुग्णांऐवजी रुग्णालयांतून बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत आहे. पालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका महिन्यात म्हणजे 17 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचे 9462 नवीन रुग्ण आढळले आहेत. जर आपण या आकड्यांचे मूल्यमापन केले तर, दर तासाला सरासरी 13 नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या एका महिन्यात 11,515 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचा अंदाज घेतला, दर तासाला सरासरी 16 रुग्ण कोरोनातून बरे होऊन रुग्णालयातून घरी परतत आहेत.

हेही वाचा: कोण आहेत 'पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ?; विक्रम गोखलेंच्या भाषणात उल्लेख

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, कोरोनाची प्रकरणे लक्षणीयरीत्या कमी झाली आहेत, लसीकरणामुळे लोकांमध्ये कुठेतरी प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.

95% खाटा रिक्त

कोरोना रुग्णांसाठी राखीव असलेल्या एकूण खाटांपैकी 95 टक्के खाटा रिकाम्या आहेत. शहरातील 23000 कोविड बेडपैकी केवळ 1500 खाटांवर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जंबो सेंटरमध्ये 6,000 खाटांवर फक्त 300 रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

रिकव्हरी दर 97%

गेल्या वर्षी मार्च ते 17 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 60 हजार 270 बाधित रुग्ण आढळले होते, त्यापैकी 7 लाख 38 हजार 599 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97टक्क्यांवर पोहोचला आहे.

दुप्पटीचा दर वाढला -

कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. 17 ऑक्टोबर रोजी मुंबईचा दुप्पट होण्याचा दर 1214 दिवस होता, जो एका महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरपर्यंत वाढून 2098 वर पोहोचला आहे.

loading image
go to top