esakal | कोरोनाने तोडल्या जाती-धर्माच्या भिंती; मरीनलाईन्सच्या मुस्लिम कब्रस्तानात हिंदू बांधवांवर अंत्यसंस्कार...
sakal

बोलून बातमी शोधा

bada kabrasthan

जात आणि धर्माच्या भीती गेल्या काही वर्षांत बळकट झाल्या होत्या. त्यात हिंदू - मुस्लिम यांच्यातील द्वेषाचे राजकारण केले गेले. कोरोनाच्या महारोगाने जातीच्या भीती पुसल्या जात आहेत. बडा कब्रस्थानमध्ये तर जाती धर्माच्या भीतीच उध्वस्त झाल्या आहेत. या कब्रस्थानत दिसते ती फक्त मानवता.

कोरोनाने तोडल्या जाती-धर्माच्या भिंती; मरीनलाईन्सच्या मुस्लिम कब्रस्तानात हिंदू बांधवांवर अंत्यसंस्कार...

sakal_logo
By
विष्णू सोनावणे

मुंबई : मुंबईत कोरोना अजूनही नियंत्रणात येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण मुंबईत गरिब आणि श्रीमंतांमध्येही वाढतोय. मुंबईत आतापर्यंत 4631 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईतील सर्व स्मशानभूमीमध्ये रोज प्रेतांचा खच पडत आहे. एका प्रेतावर अंत्यसंस्कारासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागत असल्याने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून पालिकेकडून अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली. 

मुंबई विमानतळाच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड; जीव्हीकेच्या अध्यक्षासह 'इतके' जण सीबीआयच्या रडारवर...

तसेच कोरोना झाल्यावर संबंधिताला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नातेवाईक, शेजाऱ्यांनी तर कोरोनाबाधीत कुटुंबाना वाळीत टाकल्याचे प्रकरणही समोर आले होते. अशावेळी मरीनलाईन्स येथील बडा कब्रस्थान हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांसाठी दिलासा देणारे ठरले आहे. या कब्रस्थानमध्ये गेल्या एप्रिलपासून मुस्लिमांच्या मृतदेहाचे दफन होत आहेच; मात्र येथे हिंदूं बांधवांच्या कोरोनाच्या सुमारे 200 मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती बडा कब्रस्थानचे सदस्य इकबाल ममदानी यांनी दिली. त्यामुळे या कब्रस्थानात कोरोनाने जाती धर्माच्या भिंतींना मूठमाती दिल्याचे दिसून आले. 

थरथरत्या हाताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,असू शकतो 'हा' मेंदूचा गंभीर आजार

जात आणि धर्माच्या भीती गेल्या काही वर्षांत बळकट झाल्या होत्या. त्यात हिंदू - मुस्लिम यांच्यातील द्वेषाचे राजकारण केले गेले. कोरोनाच्या महारोगाने जातीच्या भीती पुसल्या जात आहेत. बडा कब्रस्थानमध्ये तर जाती धर्माच्या भीतीच उध्वस्त झाल्या आहेत. या कब्रस्थानत दिसते ती फक्त मानवता. या कब्रस्थानातील  कमिटीच्या सदस्यांनी शहर आणि उपनगरासाठी तीन गट तयार केले आहेत. ते गट अडचणीत असलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांच्या मृतदेहांवर त्यांच्या धार्मिक रितिरिवाजानुसार आणि मृतदेहाचे पावित्र्य राखून अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती ममदानी यांनी दिली.

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत

कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक घाबरत आहेत. एखादं दुसरा नातेवाईक मृतदेहासोबत येतो. आई किंवा वडिलांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुले तयार होत नाहीत. काही नातेवाईक मृतदेह रुगणालयात सोडून जात आहेत. अशा मृतदेहांवर आमची टीम रुग्णवाहिका नेऊन मृतदेह आणून त्यावर त्याच्या धार्मिक रितिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातून किंवा कोणत्याही नातेवाईकांचा फोन आल्यास आमची टीम त्यांना मदत करते असेही ते म्हणाले. 

loading image
go to top