esakal | राज्यात कोरोना मृतांचा आकडा 40 हजाराच्या पार; मुंबईत दिवसभरात 26440 रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात कोरोना मृतांचा आकडा 40 हजाराच्या पार; मुंबईत दिवसभरात 26440 रुग्ण कोरोनामुक्त

आज राज्यात 11,416 कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 15,17,434  झाली आहे.

राज्यात कोरोना मृतांचा आकडा 40 हजाराच्या पार; मुंबईत दिवसभरात 26440 रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : आज राज्यात 11,416 कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 15,17,434  झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण 2,21,156 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आज 308 मृत्यू झाले आहेत.  

16 वर्षीय मजुरी करणाऱ्या आदिवासी मुलीवर ठेकेदाराने केला बलात्कार; पाली पोलिसांत गुन्हा दाखल

राज्यात आज दिवसभरात 26,440  रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 12,55,779 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर वाढून 82.76 टक्के इतका झाला आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे.  

आज राज्यात दिवसभरात 308 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 40,040 वर पोहोचला आहे. आज नोंद झालेल्या 308 मृत्यूंपैकी 168 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 60 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 80 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.   

ज्येष्ठांच्या तक्रार आयोगाचे कामकाज कधी सुरू करणार? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

आज नोंद झालेल्या 308 मृत्यूंमध्ये ठाणे परिमंडळ 77, पुणे 94,नाशिक 47, कोल्हापूर 17,औरंगाबाद 5, लातूर मंडळ 22,अकोला मंडळ 13 ,नागपूर 33 येथील मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 75,69,447 नमुन्यांपैकी 15,17,434 ( 20.05 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22,68,057 लोकं होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 24,994 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )