ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 3 हजार पार, तर दिवसभरात...

corona
corona

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात एक हजार 249 रुग्णांची तर, 38 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या एक लाख पाच हजार 319 तर, मृतांची संख्या आता तीन हजार 9 झाली आहे.  

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 419 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 20 हजार 549 तर, मृतांची संख्या 503 वर पोहोचला आहे. त्या पाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 288  रुग्णांची तर, 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 24 हजार 100 तर, मृतांची संख्या 489 वर गेली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 172 बाधितांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 23 हजार 106 तर, मृतांची संख्या 738 वर गेली आहे.

मीरा भाईंदरमध्ये 168 रुग्णांची तर, 11 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 10 हजार 560 तर, मृतांची संख्या 358 इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात 34 बधीतांची तर, दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 889 तर, मृतांची संख्या 270 झाली. तसेच उल्हासनगर 31 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 329 तर, मृतांची संख्या 176 झाली आहे.

अंबरनाथमध्ये 36 रुग्णांची तर, एकाचा मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 461 तर, मृतांची संख्या 172 झाली. बदलापूरमध्ये 41 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 376 इतकी झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 60 रुग्णांची तर, एक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 949 तर, मृतांची संख्या 244 वर गेली आहे.

(संपादन : वैभव गाटे)

corona death toll rises to 3000 in Thane district today corona positive is

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com