शहापुरातही होणार कोरोनाची तपासणी; फिवर क्लिनिक सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबांधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहापुरात देखील एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर शहापुरातील वनप्रशिक्षण केंद्रात शुक्रवारपासून (ता. 24) कोरोना फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये तापाची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यात येणार असून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येणार आहेत. 

शहापूर : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबांधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहापुरात देखील एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर शहापुरातील वनप्रशिक्षण केंद्रात शुक्रवारपासून (ता. 24) कोरोना फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये तापाची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यात येणार असून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येणार आहेत. 

क्लिक करा : ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली तरी...

शहापुरातील उपजिल्हा रुग्णालय हे नॉन कोव्हिड रुग्णालय असल्याने कोरोना फिवर क्लिनिक रुग्णालयाबाहेर असावे अशा सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने दिल्या आहेत. त्यानुसार शहापुरातील वनप्रशिक्षण केंद्रात हे कोरोना फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. 

क्लिक करा : खाकीतली माया! लॉकडाऊनमध्ये 'त्या' आजीच्या मदतीला धावून गेले पोलिस

हे क्लिनीक सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत सुरू राहणार असून येथील रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पुढील तपासणासाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Fever Clinic in Shahapur