मुंबई: कोरोनाचा क्षयरोगाच्या रुग्णांवर परिणाम नाही

दोन वर्षांत संसर्ग घटला; पालिकेच्या अहवालातील निष्कर्ष
मुंबई: कोरोनाचा क्षयरोगाच्या रुग्णांवर परिणाम नाही
sakal

मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक परिणाम मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच क्षयरोग असलेल्या रुग्णांवर होत असल्याचे आतापर्यंत सांगण्यात येत होते; मात्र कोरोना काळात म्हणजे गेल्या दोन वर्षांत क्षयरोगाच्या रुग्णांवर कोरोनाचा कमी प्रमाणात परिणाम झाल्याची दिलासादायक बाब महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे. शिवाय, त्यांच्यात क्षयरुग्णांचा मृत्युदरही कमी झाल्याचे सांगण्यात आले.

मुंबई: कोरोनाचा क्षयरोगाच्या रुग्णांवर परिणाम नाही
भाजपाच्या कार्यकर्त्यांचे महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २०२० मध्ये २९८ टीबी रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला. २०२० च्या तुलनेत २०२१ च्या जानेवारी ते ऑगस्टदरम्यान केवळ १५४ टीबी रुग्णांना कोरोना झाला आणि केवळ १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे टीबी रुग्णांमध्ये कोरोना शोधण्यासाठी पालिकेने गेल्या वर्षी १३ हजार १५५ चाचण्या केल्या; तर या वर्षी १२ हजार १४८ चाचण्या करण्यात आल्या.

टीबी रुग्णांना ‘डॉट’ उपचार दिले जातात. वेळोवेळी उपलब्ध औषधांव्यतिरिक्त त्यांना प्रथिनयुक्त पौष्टिक आहार दिला जातो. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यातच जुलै महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना कोरोना रुग्णांची टीबी चाचणी आणि टीबी रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून टीबीच्या रुग्णांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी असल्याचे पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी आणि मुंबई क्षयरोग नियंत्रण मोहिमेच्या प्रमुख डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले.

चाचण्यांचे प्रमाण समाधानकारक

मुंबईत टीबी रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. पालिका रुग्णालयात २०१९ मध्ये १ लाख ३३ हजार चाचण्यापैकी २५ हजार ९०३ रुग्ण सापडले होते. २०२० मध्ये कोरोनाचा आलेख चढा असताना ९९ हजार ६६८ चाचण्या केल्या. त्यात १७ हजार रुग्ण सापडले; तर २०२१ मध्ये ऑगस्टपर्यंत ७३ हजार ८९३ चाचण्या केल्या असता, त्यात १४ हजार १९८ रुग्ण सापडल्याचे डॉ. टिपरे यांनी सांगितले.

मुंबईत टीबीसह कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. टीबी रुग्णांना दिली जाणारी औषधे व पोषक आहारामुळे त्यांची रोग प्रतिकारकशक्ती चांगली असते. शिवाय त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जाते.- डॉ. प्रणिता टिपरे, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com