कोरोनामुळे मानसिक आरोग्य खालावले! 65 टक्के नागरिकांत आत्महत्या, इजा करुन घेण्याचे विचार

कोरोनामुळे मानसिक आरोग्य खालावले! 65 टक्के नागरिकांत आत्महत्या, इजा करुन घेण्याचे विचार


मुंबई : कोरोनामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य खालावले आहे. अनेकांना तर नैराश्याने ग्रासले असून  आत्महत्या, स्वत:ला इजा करुन घेण्याचे विचार त्यांच्या मनात येत आहेत. सुमारे  65 टक्के नागरिकांत अशा प्रकारचे विचार येत आहेत. चिंता, नोकरी गमावणे, एकाकीपणा आणि आर्थिक असुरक्षितता या बाबी चिंतेच्या यादीत आहेत.
कोरोना संसर्गापुर्वी  भारतात 15 कोटी भारतीयांना मानसिक आरोग्य सेवेची आवश्यकता होती. यातील केवळ 3 कोटी जणांवर योग्य उपचार मिळाले आहेत. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण 2016 मधून ही आकडेवारी समोर आली आहे. आता या संख्येत वाढ झाली आहे.  

लॉकडाउन, सक्तीने वेगळे करणे, विषाणूची भीती, आर्थिक असुरक्षितता, घरगुती हिंसाचार आणि वाढती चिंता यामुळे संकट अधिकच गंभीर झाले आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांमध्ये झालेल्या 
वाढीमुळे बंगळुरू मधील आत्महत्या प्रतिबंधक इंडिया फाउंडेशनने (एसपीआयएफ) काही मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने सर्वेक्षण केले. त्यानुसार कोरोनामुळे घोषीत केलेल्या लॉकडाउननंतर स्वत: ला इजा करण्यासह  आत्महत्या करण्याच्या विचारात वाढ झाली आहे. ही संख्या 65 टक्के आहे. त्यामुळे जनजागृती,  सामाजिक पाठबळ याशिवाय सरकारने सामाजिक-आर्थिक सुरक्षा देणे आवश्यक आहे. अत्याचारग्रस्तांना मदत करण्याच्या पद्धतींचा विचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

एसपीआयएफचे संशोधन सल्लागार नूर मलिक यांनी सांगितले की, कोरोनामुळे अधिक काळ घरातच राहिल्याने मानसिक आजार, आर्थिक असुरक्षितता आणि कामाचा ताण यासंबंधी जोखीम वाढली आहे. सतत चिंता, मन नियंत्रणात नसल्याची भावना,  नोकरीची अनिश्चितता आदी सतावत आहेत. शिवाय, आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मानसिक आरोग्याच्या संदर्भात काही गटांवर इतरांपेक्षा जास्त परिणाम झाला आहे. 

20 ते 40 वयोगटातील व्यक्तींचा पुढाकार
20 ते 40 वयोगटातील व्यक्तींनी मानसिक उपचारासाठी सर्वात अधिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानंतर 18 ते 25 आणि 40 ते -60 वयोगटातील व्यक्तींलीही आपल्या मानसिक आजारांवर मदत घेतली असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

शारीरीक व्याधींत वाढ 
कोरोनाच्या साथीमुळे देशभरातील नागरिकांना नवीन जीवनपद्धतीशी जुळवून घेणे भाग पडत आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा ताण येत असल्याचे दिसत आहे. मानसिक ताणतणाव वाढल्यामुळे आपोआप झोप व जेवण कमी होते. त्याचा परिणाम शारीरिक व्याधींच्या वाढीवर होतो. चिडचिड वाढणे, कोणतेही शारिरीक कारण नसताना डोके दुखणे, आ.िर्थक चिंतेची तीव्रता वाढणे,   करोनाचा आजार होईल अशा भीतीने ग्रासले जाणे इत्यादी स्वरुपाची लक्षणे या काळात नागरिकांमध्ये वाढली आहेत. 

कर्करोगासारखे काही अपवाद वगळता अनेक जीवघेण्या आजारांवर चांगली औषधे निर्माण झाली आहेत. परंतु कोरोना सारख्या महामारीवर औषध अजूनही आले नाही. त्यामुळे हा आजार आपल्याला झाला तर आपले काही खरे नाही या विचारातून सुद्धा अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. भारतात अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणूनच या काळामध्ये मानसिक संतुलन म्हणजेच आपल्या मनावर ताबा मिळवला पाहिजे. 
-  डॉ. प्रतीक सुरंदशे,
मनोविकारतज्ज्ञ, अपेक्स हॉस्पिटल समूह

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com