ठाणे : ग्रामीण भागात कोरोनारुग्णांची वाढती संख्या; ४०० बेड्स होणार सज्ज |Thane corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Bed
ठाणे : ग्रामीण भागात कोरोनारुग्णांची वाढती संख्या; ४०० बेड्स होणार सज्ज

ठाणे : ग्रामीण भागात कोरोनारुग्णांची वाढती संख्या; ४०० बेड्स होणार सज्ज

ठाणे : मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) आटोक्यात आला होता. डिसेंबर महिन्याच्या अखेरीपासून ओमिक्रॉनने (Omicron variant) ठाणे जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होवू लागली आहे. जिल्ह्यातील शहरी भागात रुग्णांची जलद गतीने वाढ होत असताना, ग्रामीण भागात रुग्णांची संख्या आटोक्यात होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून ग्रामीण भागात (corona patients increases in rural area) देखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात पाच कोविड केअर सेंटर (Five corona center) पुन्हा सुरु करण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी सुमारे ४०० बेड्स उपलब्ध होणार आहेत. (corona new patients increases thane rural area four hundred beds available)

हेही वाचा: थिएटर बंद होणार?: अमित देशमुख यांनी दिलं उत्तर

ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून दुप्पटीने रुग्णवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. याची गांभीर्याने दखल घेत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील गोठेघर आश्रम शाळा, भिवंडीतील भिनार, कल्याण येथील वर्प आणि मुरबाड ट्राम केअर सेंटर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये शहापूर, भिवंडी, कल्याण या ठिकाणी प्रत्येकी १०० बेड्स असणार असून मुरबाड ट्राम केअर सेंटरमध्ये ५०, तर अंबरनाथ बीएसयूपी सोनिवली येथे ४० बेड्स असणार आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स, आरबीइसके पथक कार्यरत असणार आहेत.

हेही वाचा: संभाजीराजे संतापले: रायगडावर ‘मदार मोर्चा’ वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न

"ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येची गांभीर्याने दाखल घेत तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण भागात पाच कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत आहे. यामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे."
- डॉ. मनिष रेंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी. जि.प. ठाणे.

"कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळावी . यासाठी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. ते आताही सुरु करण्यात येत आहेत."
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

कोविड केअर सेंटर बेड्स

शहापूर (गोठेघर) १००

भिवंडी (भिनार) १००

कल्याण (वरप) १००

मुरबाड (ट्राम केअर सेंटर) ५०

अंबरनाथ (बीएसयूपी सोनिवली) ४०

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ThaneCoronavirus
loading image
go to top