राज्यात कोरोना फोफावतोय ! दिवसभरात रुग्णसंख्या 2 हजार पार, तर इतक्या जणांचा मृत्यू

coronavirus
coronavirus

मुंबई : राज्यात कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग वेगाने फोफावत असून मंगळवारी 2127 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 37,136 झाली आहे.आणखी 76 रुग्ण दगावल्यामुळे मृतांचा आकडा 1325 वर पोहोचला आहे. त्यापैकी 26,164 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील 1202 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत एकूण 9639 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात 76 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी झाली.मुंबईत 43, ठाणे शहरात 15, पुण्यात 6, अकोल्यात 3  आणि नवी मुंबई व बुलडाण्यात प्रत्येकी 2; तसेच नागपूर शहर, औरंगाबाद शहर, धुळे शहर व नाशिक शहरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 50पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी 30 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 39 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि 7 रुग्ण 40 वर्षांखालील होते. त्यांच्यापैकी 58 रुग्णांना (76 टक्के)मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते.कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1325 झाली आहे. आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेल्या 2,93,998 नमुन्यांपैकी 2,56,862 नमुने निगेटिव्ह आणि 37,136 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

9639 रुग्ण कोरोनामुक्त
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.राज्यात सध्या 1765 कंटेनमेंट झोन असून, मंगळवारी एकूण 15,178 सर्वेक्षण पथकांनी 63.29 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.आतापर्यंत बऱ्या झालेल्या 9639 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.सध्या राज्यात 3,86,192 जण होम क्वारंटाईनमध्ये, तर 21,150 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Corona out of control in maharashtra  2127 new patients; Death of 76 victims

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com