esakal | पर्यावरणपूरक विसर्जनाला भक्तांची पसंती; ऑनलाईन बुकींगला प्राधान्य
sakal

बोलून बातमी शोधा

Ecofriendly ganpati festival

पर्यावरणपूरक विसर्जनाला भक्तांची पसंती; ऑनलाईन बुकींगला प्राधान्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोविड नियमांमध्ये (corona rules) संपन्न होत असलेल्या गणेशोत्सवात (Ganpati Festival) गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून (Government) घालण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे उत्सवाचे रूप बदलत आहे. परंपरेनुसार वाहत्या पाण्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची भाविकांची श्रद्धा असताना पर्यावरणाचा प्रदूषण (Environment pollution) थांबण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी (Crowd management) महापालिकेने (bmc) तयार केलेल्या कृत्रिम तलावांना पसंती मिळत आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी एक हजार पेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन बुकिंग (online booking) करून गणेश विसर्जनाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या गौरी-गणपतीच्या विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाली आहे.

हेही वाचा: कल्याण डोंबिवली पालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

गेल्या वर्षी पेक्षा यंदा गणेशोत्सवकाळात कोविडची दुसरी लाट आता ओसरत आल्याने उत्सव साजरा करता येत आहे. परंतु उत्सव साजरा करताना कोविड नियमांचे पालन करावे लागत असल्याने आनंदाला मर्यादा आल्या आहेत. मात्र समाजातील बदलत्या विचारांमुळे उत्सवाचे स्वरूपही बदलू पाहत आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरातील १५१ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तर २२ ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गणेशविसर्जन केले जात आहे. परंतु हे विसर्जनही गॅबियन पद्धतीने तयार केलेल्या तलावांमध्ये होत असल्याने नवी मुंबईत गणेशोत्सव काळात पाण्याचे होणारे प्रदूषणावर नियंत्रण आले आहे.

नवी मुंबईत मंगळवारी ठिक-ठिकाणी गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे. कोविडमुळे आधीच दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवांनी उत्सवाचे दिवस कमी करून पाच दिवसांवर आले आहे. त्यामुळे गौरी-गणपतीच्या विसर्जनाचे प्रमाण वाढले आहे. त्याकरिता विसर्जनस्थळांवर काही गोंधळ होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी ठिक-ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. महापालिकेनेही कृत्रिम तलाव आणि पारंपरिक विसर्जन तलाव घाटावर महापालिकेतर्फे निर्माल्य कलश, तराफा, विसर्जन करणारे स्वयंसेवक तैनात केले आहे.

एक हजार नागरिकांनी केले ऑनलाईन बुकिंग

विसर्जन घाटावर गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेने गणेश भक्तांकरिता ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था केली आहे. तसेच घरापासून कोणता तलाव अंतराने जवळ आहे हे शोधण्यासाठी नकाशाही उपलब्ध केला आहे. त्यामुळे विसर्जन घाटावर गर्दीत ताटकळत बसण्यापेक्षा बहुतांश भक्तांनी विसर्जनाकरिता ऑनलाईन बुकींगद्वारे वेळ निश्चित करण्यावर अधिक भर दिला आहे. २०० पेक्षा जास्त दीड दिवसांच्या गणपतींनी ऑनलाईन बुकिंगद्वारे विसर्जनाचा लाभ घेतला. आता संध्याकाळपर्यंत ९०० पेक्षा जास्त लोकांनी पाच दिवसांकरिता वेळ निश्चित केल्या आहेत.

loading image
go to top