esakal | कोरोनामुळे विमा क्षेत्र मजबुत! आरोग्य विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली; प्रिमीयम उत्पन्नात दिड हजार कोटीने वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे विमा क्षेत्र मजबुत! आरोग्य विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली; प्रिमीयम उत्पन्नात दिड हजार कोटीने वाढ 
  • कोरोना संसर्गामुळे विमा क्षेत्राच्या परिस्थितीत सुधारणा
  • आरोग्य विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली 
  • प्रिमीयम उत्पन्नात दिड हजार कोटीने वाढ 
  • कोविड कवच पॉलीसीला भरघोस प्रतिसाद 

कोरोनामुळे विमा क्षेत्र मजबुत! आरोग्य विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली; प्रिमीयम उत्पन्नात दिड हजार कोटीने वाढ 

sakal_logo
By
विनोद राऊतमुंबई ; कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे आरोग्य विमा काढण्याकडे सामान्य लोकांचा कल वाढलाय. देशात वैयक्तीक आरोग्य पॉलीसी धारकांची संख्या मर्यादीत होती. मात्र वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येसोबत आरोग्य पॉलीसी घेणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात आरोग्य पॉलीसी  प्रिमीयम उत्पन्नात तब्बल दिड हजार कोटीने वाढ झाली आहे. जनरल इंश्यूरन्स कॉन्सिंलच्या ताज्या आकडेवारीवरुन  ही माहिती समोर आली आहे.

चेस द व्हायरसचा पुढचा टप्पा! जेष्ट नागरीकांसह, दिर्घकालीन आजार असल्यांची कोविड चाचणी

प्रिमीयम उत्पन्नात वाढ 
कोरोना काळात उत्पन्न घटल्यामुळे  कोरोनाची लागण झाल्यास  वैद्यकीय खर्चाचा मोठा प्रश्न मध्यवर्गीयांपुढे उभा झाला होत. त्यामुळे या काळात अनेकांनी आरोग्य विमा काढण्याला प्राधान्य दिले. देशातील विमा कंपन्यांनी आरोग्य पॉलीसी विक्रीतून  मिळवलेल्या प्रिमीयम उत्पन्नातून हे दिसून येते. जुलै महिन्यात कंपन्यांनी 7124 कोटी रुपयाचे प्रिमीयम उत्पन्न कमावले. गेल्या वर्षी हे उत्पन्न 5,667 कोटी रुपये एवढे होते. म्हणजे प्रिमीयम उत्तन्नात 31 टक्के वाढ झाली आहे.

एकदंरीत आरोग्य विमा क्षेत्राने चांगलीच उसळी घेतल्याचे चित्र आहे. यापुर्वी वैयक्तीत आरोग्य विम्याऐवजी कंपनी, गट विमा काढणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त होती. यावेळी प्रिमीयम उत्पन्नात सुमारे 10.4 टक्क्याने वाढ झाली आहे. एकट्या जुलै महिन्यात आरोग्य विमा प्रिमीयम उत्पन्न 18,415 कोटी रुपये होते. गेल्या वर्षी याच महिन्यात ही रक्कम 16,674 कोटी एवढी होती. 

BIG NEWS - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिस समांतर तपास करणार ? अनिल देशमुख म्हणालेत..

कोविड कवच पॉलीसीअंतर्गत 700 कोटींच्या दाव्यांचा निपटारा
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्य़ांनी कोविड कवच या नव्या विमा पॉलीसीची घोषणा केली होती. या पॉलीसीच्या देशभरात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 10 ते 31 जुलै या कालावधीत  4 लाख 50 हजार ग्राहकांनी आरोग्य विमा घेतला.या अंतर्गत विमा कंपन्याकडे आतापर्यंत 70 हजार विमाधारकांनी दावे दाखल केले आहे. या दाव्यापोटी 700 कोटी रुपये वितरीत करण्यात आली आहे. 14 ऑगस्टपर्यंत देशभरातून  1,15,000 विमा धारकांनी 800 कोटी रुपयाचा खर्चाचे दावे दाखल केले होते.  10 जुलै  रोजी कोविड कवच वीमा प़ॉलीसी  बाजारात लॉंच करण्यात आली होती. यामध्ये पॉलीसी अंतर्गत  कोविड उपचाराचा सर्व खर्च कव्हर करण्यात येतोय. 

क्वारंटाईनच्या भीतीने अँटीजन चाचणीस विरोध; चेंबूरमध्ये नागरिकांची अधिकाऱ्यांशी हुज्जत

दरम्यान आरोग्य, आग आणि मालमत्ता विमा काढणाऱ्यांच्या  संख्येत वाढ झाल्यामुळे विमा क्षेत्राची परिस्थिती जाग्यावर आल्याचे चित्र आहे. दुसऱ्या तिमाहीत प्रिमीयम उत्पन्नात 1.62 टक्क्याने वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत विमा कंपन्यांचे एकत्रित प्रिमीयम उत्पन्न 56,342 कोटी रुपये झाले.

-----------------------------------------------

 ( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top