esakal | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 'थैमान', दिवसभरातील रुग्णसंख्या वाचून थरकाप उडेल
sakal

बोलून बातमी शोधा

corona

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून सोमवारी (ता.25) देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाली.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 'थैमान', दिवसभरातील रुग्णसंख्या वाचून थरकाप उडेल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून सोमवारी (ता.25) देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाली. जिल्ह्यात तब्बल 280 नव्या रुग्णांसह 12 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 5 हजार 824 तर, मृतांचा आकडा 184 वर पोहचला आहे.

नक्की वाचा उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा आला गोत्यात, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातून अटक

वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान सोमवारी ठाणे पालिका क्षेत्रात 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्याने एकूण बाधितांचा आकडा 2 हजार 172 वर पोहोचला. तर,  कल्याण-डोंबिवलीत 38 नव्या रुग्णांसह 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 811 तर, मृतांचा आकडा 22 झाला. उल्हानगरमध्ये देखील 18 नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा 209 तर,  मृतांचा आकडा 9 झाला. तसेच मिरा-भाईंदरमध्ये 34 नव्या रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 533 तर,  मृतांचा आकडा 17 वर गेला आहे.

हे ही वाचा : रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

बदलापूरमध्ये 15 नव्या रुग्णांच्या नोंदीसह एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा 173 तर, मृतांचा आकडा 7 झाला. अंबरनाथमध्ये देखील 4 नवे रुग्ण आढळले असून एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 66 वर तर, मृतांचा आकडा 2 वर गेला. तसेच भिवंडीमध्ये 12 नवीन रुग्णांसह एकाचा मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा 88 तर,  मृतांचा आकडा 2 झाला आहे. यासोबतच ठाणे ग्रामीण भागात 5 नव्या बाधितांमुळे एकूण रुग्णसंख्या 281 झाली आहे. 

महत्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 'इतका' वाढला

महापालिका क्षेत्र - बाधित रुग्ण - मयत
ठाणे महापालिका - 154 - 00 
केडीएमसी - 38 - 04   
नवी मुंबई - 00 - 00 
मीरा भाईंदर - 34 - 02 
उल्हासनगर - 18 - 03  
भिवंडी - 12 - 01 
अंबरनाथ - 04 - 01  
बदलापूर - 15 - 01 
ठाणे ग्रामीण - 05 - 00

Corona in Thane district 280 new patients in 24 hours, read detail story