esakal | प्राण्यांनाही होतोय कोरोना; वाचा कोणते प्राणी आहेत ते...
sakal

बोलून बातमी शोधा

प्राण्यांनाही होतोय कोरोना; वाचा कोणते प्राणी आहेत ते...

न्यूयॉर्कच्या प्राणिसंग्रहालयात वाघाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याचे पडसाद भारतातही उमटले आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील प्राणिसंग्रहालयांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

प्राण्यांनाही होतोय कोरोना; वाचा कोणते प्राणी आहेत ते...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : न्यूयॉर्कच्या प्राणिसंग्रहालयात वाघाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याचे पडसाद भारतातही उमटले आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील प्राणिसंग्रहालयांना खबरदारीचा इशारा दिला आहे. मांजरवर्गिय तसेच माकडाच्या प्रजातींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. या प्राण्यांवर शक्‍य असल्यास सीसी टीव्हीने नजर ठेवावी, असे आदेश देण्यात आले आहेत. 

ही बातमी वाचली का? संपत्तीपेक्षा आई-वडिलांचा सन्मान अधिक महत्त्वाचा- उच्च न्यायालय 

न्ययॉर्कमध्ये प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांपासून चार वर्षांच्या वाघिणीला कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वीही माणसापासून पाळीव श्‍वानाला कोरोनाची बाधा झाल्याचे म्हटले जात होते; मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे हा वाघ कोरोनाची बाधा झालेला पहिला प्राणी ठरला आहे. असाच प्रकार भारतातील प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांबाबत घडू शकतो. त्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने सोमवारी (ता. 6) देशभरातील सर्व प्राणिसंग्रहालयांना याबाबतचे आदेश दिले आहेत. 

ही बातमी वाचली का? परीक्षा रद्द होणार नाही;  अफवा पसरवू नका...- सामंत

मांजर वर्गिय म्हणजेच वाघ, बिबट्या, सिंह अशा प्राण्यांसह तरस, कोल्हा या प्राण्यांना कोरोनाचा धोका आहे. त्याचबरोबर माकड प्रजातीतील प्राण्यांनाही धोका आहे. त्यामुळे अशा प्राण्यांवर सतत लक्ष ठेवा. शक्‍य असल्यास सीसी टीव्हीच्या मदतीने त्यांच्या हालचालींवर 24 तास लक्ष ठेवा, असे आदेश देण्यात आले आहेत. एखाद्या प्राण्यात कोरोना सदृश्‍य लक्षणे दिसल्यास त्यांना तत्काळ बाजूला काढून त्यांची चाचणी करून घ्यावी. तसेच या प्राण्यांना जेवायला देताना अथवा त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्‍टिव्ह इक्विपमेंट द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? ... तासनतास प्रवास करून त्यांना यावं लागतंय कामावर!

मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात तयारी 
भायखळा येथील महापालिकेचे प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद आहे. तेव्हापासून प्राण्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे क्वार्टर सोडून जाण्यास मनाई केली आहे. तसेच प्राण्यांजवळ जाताना मास्क आणि हॅंडग्लोजचा वापर केला जात आहे, असे प्राणिसंग्रहालयाचे अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. आता प्राण्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. 

माणसांप्रमाणेच लक्षणे 
प्राण्यांमध्ये माणसांप्रमाणेच कोरोनाची लक्षणे आढळण्याची शक्‍यता आहे. यात प्रामुख्याने सुका खोकला आणि ताप येणे ही लक्षणे असू शकतात, असे एका पशुवैद्यकाने सांगितले. 

loading image
go to top