मोठी बातमी! मुंबईत जुलै मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात, कोण म्हणतंय असं?

मोठी बातमी! मुंबईत जुलै मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात, कोण म्हणतंय असं?

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. मुंबई शहरात या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी आणि वरळीत कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसतोय. याच दरम्यान कोरोना व्हायरसची परिस्थिती पुढच्या महिन्यात आटोक्यात येईल असा विश्वास मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता 36 दिवसांवर पोहोचला असून वरळी, धारावी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यासारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. खाटा, रुग्णवाहिका, डॉक्टर, कोरोना उपचार केंद्र या सर्व सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झालीय. पालिकेच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, जनता यांचे सहकार्य लाभत आहे. याच वेगाने आपण सर्व मिळून कोरोना विरुद्ध लढत राहिलो तर जुलै मध्यापर्यंत कोरोना व्हायरस पासून होणाऱ्या संसर्गाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली असेल, त्याच दिशेने महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे, असा विश्वास पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केली आहे.

रुग्णालयांमधील सुमारे अडीच हजार कोरोना खाटा सध्या रिक्त असल्याची  माहितीही त्यांनी दिली. तर 1,300 आयसीयू खाटांपैकी 71 रिक्त आहेत. मे महिन्यातील 3,700 खाटांच्या तुलनेत आज रुग्णालयांमध्ये 12 हजार खाटा उपलब्ध आहेत. जूनअखेपर्यंत 15 हजार तर जुलै अखेपर्यंत 20 हजार खाटा उपलब्ध असतील, असे आयुक्तांनी नमूद केले. खाटांची संख्या वाढवताना डॉक्टरांची संख्याही वाढवली असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात पाचपट वाढ करतानाच महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये संसर्ग कमी आहे अशा भागातून डॉक्टरांना मुंबईत आणले. मे महिन्यातील 100 च्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या आता 700 पर्यंत पोहोचली असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

मुंबईत आतापर्यंत जवळपास 94 लाख लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. 5 लाख ज्येष्ठ नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. अशा व्यापक प्रयत्नांमुळे मुंबई पालिका हद्दीत रुग्ण दुपटीचा कालावधी आता 36 दिवसांपर्यंत पोहोचला असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. 

3 ते 22 जून 2020 म्हणजे गेल्या 19 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. एका बाजूला मुंबईतील स्थिती नियंत्रणात येत असताना विशिष्ट 6 ते 7 विभागांमधून अद्यापही मुंबईच्या एकूण रुग्णसंख्येच्या निम्मे रुग्ण आढळत आहेत. ही गोष्ट लक्षात घेता आम्ही या भागांमध्येही कठोर  पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी फिरत्या दवाखान्यांमधून या विभागांच्या सर्व परिसरांमध्ये पोहोचून तपासणी करण्यात येईल. या भागातील रुग्णांची तपासणी सातत्याने करण्यात येणार असून यातून कोरोना संशयित रुग्णांना वेगळे करून त्याच परिसरात त्यांची चाचणी केली जाईल. कोरोनाबाधितांचा वेळेवर शोध घेऊन उपचार करण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com