esakal | धक्कादायक ! 'इथे' क्वारंटाईन केलेले संशयित खुलेआम खेळतायत क्रिकेट...
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक ! 'इथे' क्वारंटाईन केलेले संशयित खुलेआम खेळतायत क्रिकेट...

धक्कादायक ! 'इथे' क्वारंटाईन केलेले संशयित खुलेआम खेळतायत क्रिकेट...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : परदेशवारी करून पनवेलमध्ये परतलेल्या 16 क्रिकेटपटूंना ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मात्र हे सर्व क्रिकेटपटू आज दिवसभर ग्रामविकास भवनाच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी पोलीस बंदोबस्त असतानाही पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी क्रिकेट खेळू दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर D-Mart बद्दल महत्त्वाची बातमी 

दूबई येथे क्रिकेट प्रिमीयर लिग खेळण्यासाठी गेलेले पनवेल आणि उरण मधील काही क्रिकेटपटू शनिवारी रात्री मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर पालिकेने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. या सर्वांना विशेष बसने उपजिल्हा रुग्णालयात नेऊन त्यांच्या कोरोना व्हायरसच्या निदान चाचण्या करण्यात आल्या. परंतू त्यांच्यामध्ये कोरोनाबाबतचे लक्षणे दिसून न आल्यामुळे खबरदारी म्हणून खारघरच्या ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्ष करून ठेवण्यात आले होते. सुरूवातीला हे सर्वच जण पळून गेल्यामुळे पुन्हा प्रशासनाने त्यांची मनधरणी करून त्यांना विलगीकरण कक्षात स्थानबद्ध केले. तसेच त्यांच्या देखरेखेखाली कर्मचारी व बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी तैनात केले. मात्र आज दिवसभर या क्रिकेटपटूंपैकी काही जण ग्रामविकास भवनाच्या समोरच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसून आले.

मोठी बातमी -  'असा' असेल होम क्वारंटाईनचा शिक्का, पाहा फोटो...

हे क्रिकेटपटू परदेशातून आले असल्यामुळे त्यांना कोरोनाची लक्षणे काही दिवसांनी जाणवू शकतात. अशा परिस्थितीत व्यक्तींमध्ये मिसळल्यास इतारांना या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचललेले आहे. मात्र हे क्रिकेटपटू सर्रासपणे खेळताना दिसून आल्यामुळे इतर नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या क्रिकेटपटूंना महापालिकेने विलगीकरण कक्षात सोडून देऊन हात वर केल्याचे काही क्रिकेट पटूंच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोणीच लक्ष द्यायला नसल्यामुळे हे क्रिकेटपटू वेळ काढण्यासाठी खेळत असल्याचे एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. 

corona update navi mumbai people in quarantine ward openly playing cricket