मुंबईत लष्कर दाखल झाल्याची पसरवली अफवा; पोलिस आले बेड्या घेऊन आणि...

मुंबईत लष्कर दाखल झाल्याची पसरवली अफवा; पोलिस आले बेड्या घेऊन आणि...

मुंबई - कोरोनाच्य संसर्गाने थैमान घातले आहे, अशा परिस्थितीत काही माथेफिरू अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. मुंबईतील पठाणवाडीमध्ये समाजमाध्यमांवर लष्कर दाखल झाल्याची अफवा पसरविणा-या तरुणाला जे.जे मार्ग पोलिसांनी अटककेली आहे.

सोहील सलीम पंजाबी आरोपीचे नाव आहे. देशांत कोरनाच्या संसर्गाने अक्षरशः धुमाकुळ घातला असुन, मुंबईत आत्तापर्यंत एक हजारहुन अधिक जण कोरोना संशयीत म्हणून सापडले आहेत. तर राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 200 च्या वर गेलीये. परंतु, अपु-या माहितीच्या आधारे काही माथेफिरू अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. अशातच एका माथेफिरुने WhatApp वर एक व्हिडिओ शेअर केला होता.

काय म्हटलंय व्हिडिओत : 

या व्हिडिओमध्ये पोलिसांची जागा आता लष्कराने घेतली आहे. नल बाजार, भिंडी बाजार, डोंगरी, मदनपुरा, काला पानी आणि सात रास्ता परिसरात परिस्थितीत हाताबाहेर गेली असून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. नागरीकावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला, असे या तरुणाने व्हिडिओमध्ये सांगितले होते.

मात्र, अशी कोणतीही परिस्थिती या परिसरात निर्माण झाली नव्हती. यामुळे हा व्हिडीओ पाहताच, जे.जे मार्ग पोलिसांनी याचा अधिक तपास करीत या माथेफिरुला अटक केली. या संदर्भात अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

corona virus covid 19 man spreading rumors about army in mumbai arrested by police

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com