मुंबईतल्या 'जी उत्तर' विभागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक

मिलिंद तांबे
Sunday, 11 October 2020

 जी उत्तरमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,065 इतकी झाली आहे. जी उत्तरमध्ये शनिवारी 78 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. धारावीमध्ये शनिवारी दिवसभरात 08 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3316 इतकी झाली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.  जी उत्तरमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,065 इतकी झाली आहे. जी उत्तरमध्ये शनिवारी 78 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. धारावीमध्ये शनिवारी दिवसभरात 08 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3316 इतकी झाली आहे. तर 162 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दादरमध्ये काल 26 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,965 इतकी झाली आहे. तर 464 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहिममध्ये काल 44 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 3,566 इतकी झाली आहे. तर 439 एक्टीव्ह रूग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणा-या जी उत्तर विभागात शनिवारी 78 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 10,847 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 569 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात धारावी 293, दादर 145 , माहिम 122 आणि बाहेरील इतर 9 मृत्यूंचा समावेश आहे.

अधिक वाचाः  वस्त्या चाळीच्या प्रभागात मृत्यूदर अधिक, सॅन्डहर्स्ट रोडचा मृत्यूदर सर्वाधिक

धारावीमध्ये 2,853, दादरमध्ये 3,350 तर माहीममध्ये 2,999 असे एकूण 9,202 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर 1,065 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत दिवसभरात 3074 कोरोनामुक्त
 

मुंबईत शनिवारी 2,203 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,27,251 झाली आहे. मुंबईत काल 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,388 वर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी 3,074 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 84 टक्के इतका झाला आहे.

बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 19,500 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल करण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 1,245 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबईत 660 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 10,121 इतकी आहे.

अधिक वाचाः  आदिवासी पाड्याचे पुनर्वसन वर्षभरात नॅशलन पार्क,आरेसाठी 90 एकर जागा राखीव

मुंबईत शनिवारी नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 48 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 16 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 30 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 
              
काल 3,074 रुग्ण बरे झाले असून कालपर्यंत 1,92,096 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 68 दिवसांवर गेला आहे. तर 9 ऑक्टोबर पर्यंत एकूण 12,47,680  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.03 इतका आहे. 

--------------------

(संपादनः पूजा विचारे)

Corona Virus Number of active patients is higher in the G North section of Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Number of active patients is higher in the G North section of Mumbai