Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर 0.13 टक्क्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Report

Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर 0.13 टक्क्यांवर

  • मुंबईचा रूग्ण दुपटीचा कालावधी 517 दिवसांवर

मुंबई: कोरोना रुग्णवाढीचा (New Cases Rate) सरासरी दर 0.13 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी (Doubling period) ही कमी होऊन 517 दिवसांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट (Recovery Rate) 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा (Active Cases) आकडा कमी होऊन 16,070 हजारांवर आला आहे. मुंबईत आज 833 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,78,278 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. (Coronavirus Update Mumbai New Cases Rate is 0.13 percent doubling period gone over 500 days)

मुंबईत आज दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 038 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 16 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 13 पुरुष तर 7 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 6 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 12 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. मुंबईत आज 794 नवीन रुग्ण सापडले तर 833 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,11,601 इतकी झाली आहे. आतापर्यंत 64,25,423 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

Corona

Corona

मुंबईत 27 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 112 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 19,465 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 854 करण्यात आले.

धारावीत 2 नवे रुग्ण, दादरमध्ये 8 रूग्ण

धारावीत आज 2 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6835 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 8 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9487 झाली आहे. माहीम मध्ये 12 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9826 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तर मधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 22 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 26,148 झाली आहे.