भाज्यांमध्ये अळ्या निघणं नेहमीचंच, पण भाजीतून चक्क जिवंत प्राणी निघाला तर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

मुंबई - दैनंदिन जीवनात आपण निरनिराळया भाज्या खात असतो. वरवर हिरव्याकंच आणि फ्रेश दिसणाऱ्या भाज्या चांगल्या असतात आणि आरोग्यासाठी लाभदायी असतात असा आपल्या सर्वांचाच समज आहे. विशेष म्हणजे वांगी, टोमॅटो, फ्लावर, वाटाण्याच्या शेंगा, शिमला मिरची इत्यादी फळभाज्या आपण घरी आणतो आणि धुवून वापरतो. मात्र आता फळभाज्या फक्त वरच्या बाजूनी बघून विकत घेणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. कारण या फळभाज्यांच्या आतमध्ये  नक्की काय निघेल यांचा अंदाजसुद्धा लावता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार एका कुटुंबासोबत घडलाय. आणलेल्या शिमला मिरचीमधून चक्क जीवंत बेडूक निघाला आहे.

मोठी बातमी -  मुंबई-अलिबाग बोट प्रवास तासाभरात! 'हे' आहेत दर...

नक्की काय घडलं :
 
निकोल गागन आणि गेरार्ड ब्लॅक यांनी नेहमी प्रमाणे बाजारातून भाजी आणली त्यात त्यांनी शिमला मिरचीही आणली. जेवण बनवताना त्यांनी शिमला मिरची धुवून घेतली आणि कापली. शिमला मिरची कापल्यानंतर त्यामध्ये त्यांना चक्क जीवंत बेडूक असल्याचं आढळून आलं. या सगळ्या प्रकारामुळे या दोघांनाही चांगलाच धक्का बसला. यानंतर त्यांनी ती बेडूक असलेली त्यांनी कॅनडातील क्युबेक इथे असलेल्या कृषी, मत्स्य आणि अन्न मंत्रालयाकडे पाठवली आहे. दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली आहे.अनेकांकडून हे फोटो व्हायरल केले जातायत. 

मोठी बातमी - उद्या उद्धव ठाकरे भेटणार नरेंद्र मोदींना, कारण आहे...

भाजीपाल्यामध्ये किडे- आळ्या निघण्याच्या घटना काही नवीन नाहीत. याआधीही अनेक वेळा अशा घटना समोर आल्या आहेत. पालेभाज्यांमध्ये अळ्या निघणे किंवा टोमॅटोमधून अळ्या निघणे, केळातून किडे निघणे असे अनेक प्रकार या आधी घडले आहेत. मात्र एका फ्रेश दिसणाऱ्या न चिरलेल्या शिमला मिरचीमधून जीवंत बेडूक निघणे हा प्रकार जरा जास्तच धक्कादायक आहे. त्यामुळे भाज्या निवडून आणि निरखून मगच खाणं अनिवार्य आहे.    

couple bought capsicum for dinner found live frog iv vegetable

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couple bought capsicum for dinner found live frog in vegetable