esakal | मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू

मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मानवी आरोग्या आणि पर्यावरणाला घातक असलेल्या 'थायी मागुर'या स्थालांतरीत माश्‍याची सर्रास विक्री होत आहे.या माश्‍यामुळे कर्करोग होण्याचीही भिती असली तरी मुंबईसह आजू बाजूच्या शहरांमध्येही सर्रास या माश्‍यांची विक्री होत आहे. आश्‍चर्य म्हणजे महानगर पालिकेच्या दादर येथील मासळी बाजारा जवळच स्थलांतरित माशांतील एक प्रकार असलेल्या 'थायी मागुर' माशावर केंद्र तसेच राज्य सरकारने बंदी घातलेली असतांनाही मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये त्याची विक्री सुरू आहे. मागुर माशामुळे कॅन्सर होण्यासाठी पोषक असणारे जीवाणू शरीरात पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  बंदी असूनही तस्करीच्या मार्गाने माशांची विक्री करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

मोठी बातमी - ठक-ठक! दरवाजा उघडा, आम्ही तुमच्या मुलांना बेड्या ठोकायला आलो आहोत...

मागुर या माशाला मागर, मागुरी, वाघूरी या वेगवेगळ्या नावाने ही ओळखलं जातं. यातील थायी मागूर या माशावर सरकारने बंदी घातली आहे. क्‍लारीअस बॅट्राशस असं या माशाचं इंग्रजी नाव आहे. थायी मागूरच सेवन आरोग्यास तसेच पर्यावरणास ही हानिकारक असल्याने केंद्र सरकारने 2000 साली या माशाच्या सेवन आणि विक्रीस बंदी घातली. केंद्रानंतर राज्य सरकारने ही बंदी घातली असुन ती आज ही कायम आहे.

मागूर माशाच्या विक्रीवर बंदी असून ही मुंबईतील काही भागात त्याची अवैध विक्री सुरू आहे. खासकरुन दादार मार्केट परिसरात दक्षिण मुंबईच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर हा मासा विकला जात आहे. पहाटे दादर मार्केट परिसरात अनधिकृतपणे मांगूर मासाचे 7-8 ट्रक उभे करून दलालांच्या माध्यमातून या माशांची विक्री केली जाते. मासळी बाजारात हा मासा 90 ते 130 रुपये किलो दराने विकला जातो. मुंबईसह रायगड, पालघर आणि पुण्यामध्ये या माशांची अवैध विक्री केली जाते. बांगलादेशात या माशाच सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं.मुंबईत परप्रांतीयांकडून या माशाला मोठी मागणी असल्याचे समजते. 

जाणून घ्या - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ? काय आहे 'लव्ह रूम..'
 

हा मासा मांसाहारी असल्याने तो काहीही खातो. यामुळे या माशाच्या शरीरात बॅक्‍टरीयासह लोह आणि पारा अतिप्रमाणात असण्याची शक्‍यता असते. अशा माशाचं सेवन केल्यास रक्त,मूत्रपिंड,यकृत किंवा आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका आहे. 

- डॉ. मधुकर गायकवाड, अधिक्षक , सेंट जॉर्ज रुग्णालय 

या प्रकरणाबाबतची अधिक माहिती मी मागितली आहे.माहिती आल्यानंतर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

- अस्लम शेख, मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री

थायी मागूर माशावर बंदी आहे.बंदीच उल्लंघन करून त्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते.आत ही कुठे या माशांची विक्री होत असेल तर आम्ही तात्काळ कारवाई करू. याबाबत केंद्रीय हरित लवादाने घालून दिलेले नियम पाळण्याचे निर्देश मी प्रत्येक जिल्ह्याला दिलेले आहेत. 

- राजेंद्र जाधव, सहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग, महाराष्ट्र राज्य.  

 
थायी मागूर माशाची वैशिष्ट्ये 

थायी मागूर मासा पाण्याव्यतिरिक्त तसेच चिखलात जिवंत राहतो. मागूर माशाची लांबी साधारणता एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत असते.मागूर माशाच्या मानेजवळ विषारी काटे असतात. तो स्वभावाने आक्रमक असून विचित्र सवय असणारा मासा अशी ही त्याची ओळख आहे. 

हेही वाचा - रहाणेच्या ट्विटवर तेंडुलकरचं उत्तर, प्रश्न वाचाल तर तुम्हीही म्हणाल..

थायी मागूरमुळे कॅन्सरचा धोका 

थायी मागूर मासा मांसाहारी आहे.तो मिळेल तो पदार्थ खातो.त्यामुळे त्याच्या शरीरात लोह, पारा असण्याची शक्‍यता असल्याने त्याचे मांस चरबीयुक्त असते शिवाय त्यात मोठ्या प्रमाणात बॅक्‍टेरियाही असतात.असे मासे सेवन करणाऱ्या व्यक्तीला कॅन्सरचा होण्याचा धोका अधिक असतो. म्हणूनच त्यावर बंदी आणलेली आहे. 

sale of thai magur fish is openly done in mumbai city health is at stake


 

loading image