Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, सोमय्या दाम्पत्याला दणका

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी सोमय्या दाम्पत्यावर भाईंदर महापालिका क्षेत्रात १०० कोटींचा शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. यानंतर मानहानीचा दावा करणारी याचिका सोमय्यांनी दाखल केली होती.
Sanjay Raut

Somaiya Petition Against Raut Dismissed

Esakal

Updated on

Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोमय्या दाम्पत्यानं दाखल केलेली याचिका फेटाळून लावत सत्र न्यायालयाने राऊतांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. खासदार संजय राऊत यांनी सोमय्या दाम्पत्यावर भाईंदर महापालिका क्षेत्रात १०० कोटींचा शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मेधा सोमय्या यांनी कोर्टात मानहानी प्रकरणी याचिका दाखल केली होती. माझगाव कोर्टानं या प्रकरणात संजय राऊत यांना शिक्षा सुनावली होती. पण राऊतांनी या शिक्षेला आव्हान दिलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com