Court
sakal
मुंबई : खासगी संस्थेच्या प्रकल्पासाठी टाटा पॉवर कंपनीची (टीपीसीएल) पुणे जिल्ह्यातील ठोकरवाडी धरण परिसरातील ८४ हेक्टर जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने नुकताच रद्द केला. खासगी संस्थेला लाभ मिळवून देण्यासाठी टाटा पॉवरच्या विद्यमान जलविद्युत प्रकल्पांना आणि त्यांच्या पाणलोट क्षेत्राला बाधा पोहोचवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.