court
महाराष्ट्रातील एका न्यायालयाने महिलांशी असभ्य वर्तनाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. अलिकडेच एका ऐतिहासिक निर्णयात बोरिवलीच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, महिलेला शिट्टी वाजवणे आणि तिचा स्कर्ट ओढणे हा अश्लीलतेचा गुन्हा आहे. हा गुन्हा थेट महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करतो. या प्रकरणात आरोपीला सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.