न्यायालयाचा दिलासा : रायगडमधील दारूबंदी उठवली, निवडणुकीदरम्यान होणार दारू विक्री

न्यायालयाचा दिलासा : रायगडमधील दारूबंदी उठवली, निवडणुकीदरम्यान होणार दारू विक्री
high courtsakal

Loksabha News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात करण्यात आलेली दारू बंदी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. हा आदेश देताना न्या. अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या दिवसापुरतीच दारू बंदी राहील.

रायगड जिल्ह्यात लोकसभेसाठी ७ मे तर मावळ लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर दारू बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्या.अतुल चांदुरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.(raigad loksabha news)

न्यायालयाचा दिलासा : रायगडमधील दारूबंदी उठवली, निवडणुकीदरम्यान होणार दारू विक्री
MP High Court: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देताना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,रायगड जिल्ह्यातील संबंधित लोकसभा मतदारसंघातच मतदानाच्या दिवसापुरताच 'ड्राय डे' राहील मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत व उरण विधानसभा मतदारसंघ येतो.

न्यायालयाचा दिलासा : रायगडमधील दारूबंदी उठवली, निवडणुकीदरम्यान होणार दारू विक्री
Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

तर रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदारसंघ येतो. रायगड लोकसभेसाठी ७ मे मतदान आहे. त्यामुळे ५ मेच्या सांयकाळी ५ वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत दारु विक्रीवर बंदी असेल. तर मावळ लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान आहे. या भागात ११ मेच्या सायंकाळी ५ वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत ड्राय डे असेल. तसेच ४ जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत ड्राय डे लागू असेल असे खंडपीठाने स्पष्ट केले असून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ड्राय डेच्या आदेशात बदल केला आहे

न्यायालयाचा दिलासा : रायगडमधील दारूबंदी उठवली, निवडणुकीदरम्यान होणार दारू विक्री
Supreme Court: ''भाडेकरू बाहेर जात नाहीत आणि घरमालकांकडे...'' जुन्या इमारतींबाबत सरन्यायाधीश असं का म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com