कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचा 'नो मास्क, नो एंट्री' फॉर्म्युला... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

पोलिस ठाण्यात "नो मास्क, नो एंट्री' 

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव सुरू असताना सर्वजण आपल्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्‍यक वस्तू आणि अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुढे असलेल्या पोलिस विभागानेही स्वतःच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबई शहरातील पोलिस ठाण्यात मास्क घालून न येणाऱ्या तक्रारदारांना "नो एंट्री' चा निर्णय घेण्यात आला आहे.

कठीण आहे - अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत आहे. मात्र अत्यावश्‍यक सेवा असलेल्या पोलिस विभागाला मात्र लॉकडाऊन करणे शक्‍य नाही. बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी आणि अधिकारीही मास्कचा वापर करीत आहेत. मात्र पोलिस मुख्यालयात तक्रारी करण्यासाठी किंवा पाठपुरावा करण्यासाठी दररोज असंख्य नागरिक येत असतात. या नागरिकांना पोलिस मुख्यालयात मास्कशिवाय प्रवेश देण्यात येत नसून प्रत्येक पोलिस ठाण्यात तक्रारदारांना मास्क घालूनच प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

मोठी बातमी - भिंतीवर लिहिली बायकोच्या प्रियकराची माहिती, पण त्या आधीच त्यानं तिला...

जखमी असल्यास रुमाल लावा! 

एखादी व्यक्ती गंभीर जखमीस्थितीत तक्रार देण्यासाठी आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून अशा तक्रारदारांनाही रुमाल बांधूनच ठाण्यात प्रवेश दिला जात आहे; तर मास्कऐवजी रुमाल बांधून आलेल्या तक्रारदाराला खात्री करूनच ठाण्यात प्रवेश दिला जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या नियमामुळे काही वेळा वादावादीचे प्रसंग घडतात, मात्र आम्हालाही आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

covid 19 mumbai police makes mask compulsory in all police stations of mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 mumbai police makes mask compulsory in all police stations of mumbai