कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबई: कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने आता महानगर पालिकेने सप्टेंबर महिन्यात केलेल्या उपाय योजनांनुसार यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी महत्वाची बैठक घेऊन रणनिती ठरवली आहे. यात 24 तासात चाचणीचा अहवाल, जास्तीत जास्त चाचण्या असे निर्देश देण्यात आले असून खासगी रुग्णालये आणि जंम्बो कोविड केंद्राचा आढावाही घेण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा कोविड रुग्णासाठी सज्ज ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.

सप्टेंबर महिन्यात मुंबईतील कोविड रुग्ण शिखरावर होते. त्या काळात ज्या प्रकारे महानगर पालिकेने यंत्रणा राबवली त्याच पध्दतीने आता यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त चहल यांनी पालिका आणि खासगी प्रयोगशाळांचे प्रतिनिधी, पालिका आणि खासगी दवाखान्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. दवाखान्यांमध्ये कोविड सदृष्य लक्षणे असलेली व्यक्ती आल्यास त्याची तत्काल चाचणी करुन घ्यावी.  तसेच संबंधित व्यक्तीचा पूर्ण पत्ता पिनकोडसह नोंदवून घ्यावा. जेणेकरुन रुग्णाला शोधण्यास त्रास होणार नाही, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. कोविड चाचणीचा अहवाल 24 तासात तयार होईल असे प्रयत्न करण्याची सूचना प्रयोग शाळांना घेतले आहे.

आयुक्तांनी आज बैठक घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात ज्या प्रकारे यंत्रणा राबवली आहे. त्याच पध्दतीने आता यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

आयुक्तांनी खासगी रुग्णालय आणि जंम्बो कोविड केंद्रांचाही आढावा घेतला आहे. खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा कोविडच्या रुग्णांसाठी सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच बरोबर जंम्बो कोविड केंद्रातील यंत्रणांचा आढावा आयुक्तांनी घेतला आहे. सर्व यंत्रणा तयार आहे.फक्त मधल्या काळात वापर नसल्याने त्यांचा फेर आढावा घेत आहे. सर्व ठिकाणचे अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन बेड्स तसेच इतर यंत्रणांची तपासणी करुन ठेवण्यासाठी ही तयारी आहे, असेही काकाणी यांनी सांगितले.

सध्या लक्षणं नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. ऑक्सिजन आयसीयू बेड्स 75 टक्के रिक्त आहेत. सर्वसाधारण बेड्स 80 टक्के रिक्त आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे. फक्त त्यांचा फेरआढावा घेण्याचे काम सुरु आहे. यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगर पालिका

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid patients increasing bmc decided implement system measures September

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com