esakal | ऑक्सफर्डच्या लसीची मुंबईत चाचणी होणार की नाही? महत्त्वाची बातमी अखेर आलीच
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सफर्डच्या लसीची मुंबईत चाचणी होणार की नाही? महत्त्वाची बातमी अखेर आलीच

कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा मुंबईतील पालिकेच्या KEM आणि नायर रुग्णालयात होणार आहे.

ऑक्सफर्डच्या लसीची मुंबईत चाचणी होणार की नाही? महत्त्वाची बातमी अखेर आलीच

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा मुंबईतील पालिकेच्या KEM आणि नायर रुग्णालयात होणार आहे. अनेक अडचणींवर मात करत अखेर आता चाचणी पालिका रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे. 

अॅस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या जगभरात सुरू आहेत. इंग्लंडमधील स्वयंसेवकांवर विपरीत परिणाम जाणवू लागल्याने तेथील चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, आता मुंबईत ही लवकरच क्लिनिकल ट्रायल केली जाईल असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे. शिवाय, डीसीजीआयने ही सर्व प्रकारचे क्लिअरन्स दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

महत्त्वाची बातमी - आदित्य ठाकरेंचं उठणं-बसणं मुव्ही माफिया आणि सुशांतच्या खुन्यांसोबत, कंगनाने पहिल्यांदाच थेट नाव घेत केलं ट्विट

देशभरातील 10 सेंटरपैकी मुंबईतील केईएम हॉस्पिटल आणि नायर रुग्णालयाची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. "कोविशिल्ड वॅक्सिन" असे या लसीचे नाव असुन देशभरातील 10 सेंटरमध्ये एकूण 1600 निरोगी लोकांवर लसीची एकाच वेळी चाचणी घेतली जाणार आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामधील 160 (निरोगी लोक) स्वयंसेवकांवर लसीची चाचणी होणार आहे. 

आयसीएमआरच्या सूचनांनुसार, सिरम इम्स्टिट्युटने तयार केलेल्या लसीच्या चाचणीसाठी देशभरातील 10 सेंटर्समध्ये ही चाचणी घेतली जात आहे. या चाचणीचा पहिला टप्पा UK मध्ये पार पडला असुन दुसरी चाचणी यूकेमधील 10 हजार लोकांवर सुरु आहे. तसेच, US आणि ब्राझिलमध्ये देखिल या लसीची चाचणी घेण्यात येईल. महाराष्ट्रातील पुण्यात ही क्लिनिकल ट्रायल सुरू झाली होती. ती काही काळ थांबवण्यात आली होती. 

महत्त्वाची बातमी  आणखी एक मोठा स्कॅम? आता स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक

भारतातील लसीची चाचणी करण्यासाठी निवडण्यात आलेले सेंटर्स  - 

  • केईएम रुग्णालय
  • नायर रुग्णालय
  • बीजे मेडिकल, पुणे
  • एम्स,  नवी दिल्ली
  • पाटणा, मेडिकल कॉलेज
  • सरकारी रुग्णालय, नागपुर
  • पीजीआय , चंदीगढ 
  • क्षयरोग रिसर्च सेंटर ,चेन्नई
  • जेएसएस मेडिकल कॉलेज ,म्हैसूर

ICMR ने या या चाचण्यांच्या क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. मात्र, अजून तरी या ट्रायल्स रुग्णालयांमध्ये सुरू झालेल्या नाहीत. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने अजून मुंबईत या लसी दिलेल्या नाहीत. या लसी मुंबईत पोचिचवल्यानंतर त्यांच्या चाचण्या सुरु होतील असं नायर रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी म्हटलंय.

( संपादन - सुमित बागुल )

covishield vaccine testing to resume in KEM and nair hospital as soon as vaccine are proided