Crime : पोलिसांची कमाल! लोकल प्रवासात प्रवाशाचा मृत्यू, पण शर्टवरील 'त्या' स्टिकरने झाला उलगडा

crime News
crime News

डोंबिवली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जत लोकलने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा लोकल प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. प्रवाशाजवळ ओळख पटविण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यांच्या अंगावरील शर्टवर असलेल्या स्टिकरने मात्र मृत प्रवाशाच्या उलगडा झाला.

crime News
Mumbai : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसंदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सर्वेक्षणही...

स्टिकरच्या माध्यमातून टेलर व त्याच्या घरच्यांपर्यंत पोलिसांना पोहोचता आले आहे. मेहबूब नासिर शेख (57) असे या मृत रहिवाशाचे नाव असून तो वांगणीमधील राहणारा आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.

मागील आठवड्यात एक प्रवासी कर्जत लोकलने छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून कर्जतच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासात त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि इतर प्रवाशांना काही समजण्याच्या आतच लोकलमध्येच त्या प्रवाशाचा मृत्यू झाला. लोकलमधील प्रवाशांनी याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना दिली. डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकल येताच पोलिसांनी तत्काळ प्रवाशाला रुक्मिणी बाई रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी त्या मृत घोषित केले. प्रवाशाजवळ त्याची ओळख पटण्याइतपत कोणतीही खूण नव्हती. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांना मृताच्या नातेवाईकांना शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या.

crime News
BKC MVA Rally: गद्दारी झाल्यानंतर सोनिया गांधींनी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला अन्...; भाई जगतापांनी केला खुलासा

मृत प्रवाशाच्या शर्टवर फॅशन टेलर, वांगणी-वेस्ट अशी नावपट्टी होती. त्यामुळे हा प्रवासी कर्जत जवळच्या वांगणी परिसरात राहणारा असावा, असा तर्क लावत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी वांगणीमधील फॅशन टेलर नावाच्या दुकानदाराचा शोध घेण्याच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार वांगणीतील फॅशन टेलरचा शोध लागल्यानंतर त्याच्या मोबाईलच्या व्हॉट्स ॲपवर प्रवाशाचा फोटो पाठविण्यात आला.

मेहबूब नासिर शेख (57) असे या रहिवाशाचे नाव असून तो वांगणीमधील लक्ष्मी सोसायटीमध्ये राहत असल्याचे टेलरने पोलिसांना सांगितले. सदर रहिवाशाचा शर्ट आपणच शिवल्याचेही या टेलरने पोलिसांना सांगितले. टेलर आणि डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी महेबूब यांचे घर गाठले. त्यांच्या कुटुंबियांना कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये मयताची ओळख करण्यासाठी येण्यास सांगितले.

महेबूब यांच्या पत्नीने पतीचा मृतदेह ओळखला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मेहबूब यांचा मृतदेह कुुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने आणि पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. पिंगळे आणि के. टी. पाटील यांनी या तपास कामात महत्वाची भूमिका बजावली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com