

Mumbai Crime
ESakal
मुंबई : राज्यभरात क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याचा समोर आला आहे. रिक्षामध्ये तरुणी एकटी असताना त्याचा गैरफायदा घेत तिला अश्लील हावभाव करून दाखवले. या घटनेनंतर मुलीने मदतीसाठी हाक मारताच तिला धावत्या रिक्षामधून बाहेर ढकलले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.