सीआयबी,आरपीएफची कारवाई; 1 कोटी रकमेसह 9 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त

हैद्राबाद येथून येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यावधी रुपयांची अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वे आरपीएफ व सीआयबी अधिकार्‍यांना मिळाली
crime news gold biscuits 1 crore cash seized Action of CIB and RPF Kalyan railway station mumbai
crime news gold biscuits 1 crore cash seized Action of CIB and RPF Kalyan railway station mumbaisakal

डोंबिवली - हैद्राबाद येथून येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यावधी रुपयांची अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वे आरपीएफ व सीआयबी अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस दाखल होताच पोलिसांनी शिताफीने 5 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 कोटी 1लाख 55 हजार रुपयाची रोकड आणि 9 लाख 14 हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. गणेश मरिबा भगत , मयूर वालदास भाई कापडी , नंदकुमार वैध , संजय मनिककामे , चंदू माकणे अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची बिस्किटे व रोकड कोठून आली याचा तपास केला जात आहे.

रेल्वे मार्गाने होणारी अवैध सामानाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग सक्रीय झाले आहेत. बुधवार 25 मेला हैद्राबादहुन मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस मधून कोट्यावधी रुपयाच्या अवैध मालमत्तेची वाहतूक केली जात असल्याची माहिती रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफ स्टाफला मिळाली होती. हैद्राबाद कडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकार्‍यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सीआयबी निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जीएस एडले, हेड कांस्टेबल विजय पाटील यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचला होता.

आरपीएफचे निरीक्षक प्रकाश यादव आणि तुकाराम आंधळे यांनी तीन वेगवेगळ्या बोगीमध्ये पाच जण संशयित रित्या प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. या पाच जणांना सामानासह ताब्यात घेत त्यांच्या सामानाची झडती घेतली असता एकाच पार्सल मध्ये 9 लाख 14 हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे असलेले 3 बॉक्स तर इतर चौघाच्या पार्सल मध्ये मिळून 1 कोटी 1 लाख 55 हजार रुपयाची रोकड असल्याचे आढळून आले. या पाचही जणांनी आपण वेगवेगळ्या कुरियर कंपन्यासाठी नांदेड, औरंगाबाद, परभणी मध्ये काम करत असून मस्जिद बंदर मधील संबधित कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हे पार्सल पोचविण्याचे काम आपल्याला देण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पुढील चौकशीसाठी ठाणे आयकर विभागाने या पाचही जणांना ताब्यात घेतले असून रेल्वेच्या आरपीएफ विभागाने हि रोकड आणि सोने ताब्यात घेत जप्त केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्राकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com