
Crime News : दारूच्या नशेत पत्नीवर बलात्कार करून अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या नराधम पतीला अटक
मुंबई : मुलुंड पोलिसांनी सोमवारी एका 40 वर्षीय नराधम पतीला पत्नीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगामध्ये प्लास्टिकचा पाईपद्वारे अनैसर्गिक संबंधाच्या आरोपात अटक केली आहे.मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी आरोपी पती मदिरेच्या नशेत होता आणि त्याने पत्नीशी अनैसर्गिक लैंगिक संबंध देखील ठेवले होते. सर्वात हीन बाब म्हणजे या नराधमाने आपल्या 4 मुलांसमोर हे दुष्कर्म केले. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुलुंड पोलिसांना एमटी अग्रवाल रुग्णालयातील डॉक्टरांकडून घटनेची माहिती मिळाली.
मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात एक 35 वर्षीय महिला तिच्या गुप्तांग दुखत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचली होती. डॉक्टरांनी विचारपूस केली असता तिने उघड केले की, तिचा पती दारूच्या नशेत घरी आला आणि तिला मारहाण करू लागला. मारहाण केल्यानंतर त्याने कथितरित्या तिचे कपडे फाडले आणि त्याने तिच्या गुप्तांगामध्ये प्लास्टिकची वस्तूने आत घुसवली. रुग्णालयात डॉक्टरांनी तिच्या गुप्तांगाना झालेल्या जखमा आढळून आल्या. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी तपास पोलिसांनी आरोपीं पतीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.