चोरीसाठी विमानाने हरियाणाहून मुंबईत; २ अटक, ५ जणांचा शोध सुरू

एटीएम फोडून 27 लाख लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
crime news mumbai police action stolen 27 lakh from ATM 2 arrested
crime news mumbai police action stolen 27 lakh from ATM 2 arrested sakal

डोंबिवली - बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून सुमारे 27 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी 48 तासात अटक केली आहे. सरफुद्दीन खान व उमेश प्रजापती अशी अटक आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाखांची रोकड व चार गाड्या जप्त केल्या आहेत. या चोरट्यांची टोळी सक्रिय असून आणखी 5 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. ही आंतरराज्यीय टोळी असून या टोळीतील 5 जण हे चोरी करण्यासाठी हरियाणा येथून विमानाने मुंबईला आले होते.

कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात असलेल्या बँक ऑफ इंडियाची दोन एटीएम रविवारी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी गॅस कटरने फोडून एटीएम मधील 27 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद होऊ नये म्हणून चोरट्यानी सीसीटिव्ही कॅमेरावार स्प्रे मारत चोरी केली होती. चोरांच्या या ट्रिकमुळे पोलिस ही चक्रावले होते. कोळशेवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार केली.

तपासा दरम्यान सात जणांची टोळी यात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. यामधील दोन आरोपी हे कल्याण शिळ फाटा परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीचा आधारे पोलिसांनी उमेश प्रजापती, सरफुद्दीन खान या दोन चोरट्यांना सापळा रचत शिळफाटा परिसरातून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर पाच साथीदारांची नावे सांगितली आहेत. हे पाच ही जण हरियाणा राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच त्यांनी नवी मुंबई खारघर येथील एका एटीएम मध्ये अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड झाले आहे.ही आंतरराज्य टोळी असून त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील अशा प्रकारे चोरी केली असावी असा संशय व्यक्त करत फरार पाच जणांचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितले.

कसे करायचे चोरी

कल्याणात चोरी करण्यापूर्वी उमेश, सरफुद्दीनला एटीएममध्ये चोरी कशी करायची, एटीएम फोडण्यासाठी कोणत्या हत्यार आणि तंत्राचा वापर करायचा ? याची माहिती देण्यासाठी हरियाणा येथून पाच जण विमानाने मुंबईत आले. तेथून ते लोकलने कल्याणला पोहोचले. त्यांनी सरफुद्दीन आणि उमेशला एटीएम फोडण्यासाठी झटपट तंत्राची माहिती दिली . बँक ऑफ इंडियाच्या एका खोलीतील दोन एटीएम फोडून सहा जणांनी 27 लाख रुपयांची रक्कम एटीएममधून चोरली. काही रक्कम उमेश व सरफुद्दीन यांना देऊन उर्वरित रक्कम घेऊन पाच चोर पुन्हा विमानाने हरियाणाला रवाना झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com