शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news Shinde group shiv sena leader Bharatshet Gogawales son threatened to die

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी...

मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना अज्ञात व्यक्तीने फोन कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसा दावा विकास गोगावले यांनी केला आहे. या फोन कॉलनंतर विकास गोगावले यांनी मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना फोन कॉलद्वारे एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे भरत गोगावले यांची शिंदे यांनी पक्षाचे मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती केली होती. या व्यक्तीने विकास गोगावले यांना चार ते पाच दिवसांत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे फोन कॉलद्वारे गोगावले यांना शिवीगाळदेखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर गोगावले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.

शिंदे गटाला धमकी देण्यात येणारी ही पहिली घटना नाही. याआधी आमदार बालाजी किणीकर यांनादेखील गोळी घालून जीवे मारण्याची धमकी आली होती. तसेच किणीकर यांना धमकीचे पत्र आले होते. दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या घटनेत त्यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र, सामंतांना केंद्र सरकारची सुरक्षा आणि राज्यातील पोलिसांची सुरक्षा असल्याने ते थोडक्यात बचावले होते.

Web Title: Crime News Shinde Group Shiv Sena Leader Bharatshet Gogawales Son Threatened To Die

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..