न्यायालयाच्या आदेशाच्या बनावट प्रतीबाबत गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

मुंबई : उच्च न्यायालयाच्या निकालाची कथित बनावट प्रत तयार करण्याच्या प्रकरणात आझाद नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. न्यायालय प्रशासनाच्या रजिस्ट्रार विभागाने मंगळवारी तकार दाखल केली.

"कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

धनादेश ठेवींबाबतच्या एका प्रकरणात न्या. गौतम पटेल यांनी कथित आदेश दिल्याचे बनावट प्रतीतून दर्शवण्यात आले आहे. यासंदर्भात अॅड. उमेश मोहिते आणि अॅड. हेतल पंड्या यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालय प्रशासनाने अंतर्गत चौकशीचा आदेश दिला. फौजदारी फिर्यादही दाखल केली आहे. न्या. पटेल यांनी संबंधित आदेशाच्या प्रतीची तपासणी केली. त्यातील अक्षराचे नमुने, निकाल लेखनाची पद्धत यात तफावत आढळली. मुख्य म्हणजे त्या आदेशावर १ डिसेंबर २०१९ अशी तारीख आहे; मात्र त्या दिवशी रविवार असल्याचे समोर आले. त्यामुळे आदेशाची प्रत बनावट असल्याचे दिसते, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

शाहरुखची मुलगी सुहाना बद्दल करण जोहर म्हणतोय, "कृपया 'त्या' अफवा आता थांबवा..."

दोन बॅंकांमधील खात्यांमधील रक्कम वळती करण्याबाबतचा उल्लेख संबंधित आदेशात आहे. न्यायालयाने दोन्ही खाती सील करण्याचे आणि हे प्रकरण मुख्य न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश रजिस्ट्रार कार्यालयाला दिले. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदवला  अाहे.

Crime registered Regarding fake copy of court order 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime registered Regarding fake copy of court order