'बायको-मुलांसमोर दारू पिऊ कशी ?' घरपोच दारूचा पर्याय मिळाला मात्र  मद्यप्रेमींची घालमेल सुरू.. 

drinking wine
drinking wine

 मुंबई: लॉकडाऊनमुळे मद्यप्रेमींची अडचण झाली आहे. मद्यविक्री सुरू झाल्यावर त्यांना काहीसा दिलासा मिळाला; मात्र वाईन शॉपपुढील रांगेत उभ राहावे लागले आणि अनेकांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही खावा लागला. आता सरकारने घरपोच मद्यविक्री सुरू केली असली, तरी ऑर्डर द्यावी की नाही, अशी त्यांची घालमेल सुरू आहे.

राज्यातील परमिट रूम बंद असून, केवळ वाईन शॉपमध्ये मद्यविक्रीला परवानगी आहे. राज्य सरकारने घरपोच मद्यविक्रीला परवानगी दिली असली, मात्र बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांत घरात बसून मद्यपान करण्याची संस्कृती नाही. त्याचप्रमाणे मद्य खरेदी करताना पोलिसांचा प्रसाद मिळण्याची शक्यता असल्यामुळे मद्यप्रेमींची पंचाईत झाली आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक जण बाहेरून गुपचूप मद्यपान करून रात्री घरी येत असत आणि जेवण करून झोपी जात असत. त्यामुळे बहुधा कुटुंबीयांना संशय येत नसे आणि प्रतिष्ठाही अबाधित राहात असे. 

आता मद्य विकत घेण्यासाठी दुकानापुढे रांगेत उभे राहू शकत नाही, घरपोच सेवेचा लाभ घेऊ शकत नाही आणि मित्राकडे ’बसू’ शकत नाही, अशी बिकट अवस्था मद्यप्रेमींची झाली आहे. दररोज दारू पिण्याची सवय नाही. कधी तरी मद्यपानाची इच्छा होते. त्यासाठी परमिट रूम योग्य ठिकाण आहे. सध्या हॉटेल, बार बंद आहेत. रांगेत उभे राहणे कष्टाचे आहे. घरपोच सेवा सुरू झाली, तरी ऑर्डर देणार कशी, हा प्रश्न असल्याची व्यथा एका मद्यप्रेमीने व्यक्त केली.

दारूमुळे होतोय तासाला एकाचा मृत्य: 

जगभरात अतिमद्यपानामुळे वर्षाला ३० लाख जण म्हणजे दिवसाला ६००० व्यक्तींचा मृत्यू होतो. भारतात अतिमद्यपानामुळे तासाला एकाचा मृत्यू होतो. २०१८ मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामुळे ही माहिती समोर आली. अतिमद्यपानामुळे देशातील बळींची संख्या वर्षाला अडीच लाखांवर गेली आहे. रस्ते अपघातात एक लाख नागरिकांचा मत्यू होतो. यकृताशी संबंधित आजाराने एक लाख जण दगावतात. कर्करोगामुळे ३० हजार व्यक्ती मृत्युमुखी पडतात. या परिस्थितीतही मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण 11 वर्षांत 38 टक्क्यांनी वाढले आहे. जगातील ५ टक्के आजार मद्यपानाशी संबंधित आहेत.

"मद्याच्या व्यसनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कोरोना महामारीच्या काळात मद्यपानामुळे घरेलू हिंसाचार वाढला आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मद्यपान करत असल्यास पत्नी आणि मुलांपुढील प्रतिमा डागाळली जाईल. मद्यपान करणाऱ्याच्या शारीरिक आणि मानसिक त्रासात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मद्यपान टाळलेच पाहिजे", असं महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी म्हंटलंय. 

how to drink wine at home people are hesitating to do so read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com