
टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपासाला सुरुवात केलीय. तब्बल तीन लाख पेक्षा जास्त लोकांची टोरेस कंपनीनं फसवणूक केल्याची माहिती असून हा घोटाळा १ हजार कोटींचा असल्याचा अंदाज आहे. टोरेसच्या दादर कार्यालयात ५ ते ६ कोटींची रोकड असल्याची माहितीही समजते. कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचं पथक दाखल झालंय. या पथकाकडून कार्यालयात पंचनामा केला जात आहे.