गर्दीचे नियोजन की खासगीकरणाची खटपट ? कोरोनाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट 

गर्दीचे नियोजन की खासगीकरणाची खटपट ? कोरोनाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट 

मुंबई, ता. 4 : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले आहे. यात प्रत्येक बाबींचे दर प्रचंड वाढल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या रेल्वेची तिकिटे देखील वाढतायत.  कोरोनामुळे गर्दीचे नियोजन व्हावे, यासाठी अनेक अटी आणि नियम लागू केले आहेत. मात्र, यातून रेल्वे प्रवाशांची लूट होत आहे, असा आरोप प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.

रेल्वेचे ज्येष्ठांना आणि इतर सवलतधारक प्रवाशांना मिळणारे सवलतीचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे त्यांना नेहमीपेक्षा जादा भाडे द्यावे लागते. रेल्वे प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन सुरु आहे की खासगीकरणाकडची वाट धरत आहेत, असा प्रश्न प्रवासी संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.  कोरोना आणि लॉकडाऊन काळात भारतीय रेल्वे प्रवासी सेवा बंद होती. फक्त मालवाहतूक सेवा भारतीय रेल्वेद्वारे सुरु होती. त्यानंतर अनलॉक काळात प्रवासी रेल्वे वाहतूक सेवा सुरु केली. यात कोरोना विशेष नावाने मेल, एक्सप्रेस धावू लागल्या आहेत.

मात्र, या एक्सप्रेसमध्ये सवलतधारक प्रवाशांना कोणतीही सवलत देण्यात आली येत नाही. त्यामुळे प्रवाशांना खिशातील जादा पैसे तिकिटांसाठी मोजावे लागतात. रेल्वे मार्गावर धावणाऱ्या खासगी एक्सप्रेसमध्ये तिकीट दरात सवलत नाही. त्यामुळे कोरोना काळात प्रवाशांना विना सवलतीचे, पाच पट जादा प्लॅटफॉर्म तिकिटाचे सवय लावण्यात येत आहे का, अशा प्रश्न प्रवाशांनाकडून उपस्थित केला जात आहे. 

प्रवासी कुंदा मेश्राम या बेलापूरहुन सीएसएमटी ते नागपूर तिकीट काढत होत्या. मात्र, त्यांना सवलतीचे तिकीट देण्यात आले नाही. याबाबत त्यांनी विचारणा केली असता, त्यांना कोरोना विशेष ट्रेनमध्ये सवलतीचे तिकीट देत नसल्याचे कारण दिले. मात्र, रेग्युलर गाडी असो व कोरोना विशेष ट्रेन सवलतीच्या दरातील तिकीट मिळणे आवश्यक आहे. खासगी रेल्वेप्रमाणे भारतीय रेल्वेमध्ये अशी व्यवस्था सुरु करण्याची योजना सुरु आहे. ज्येष्ठ नागरिक मौजमजा करण्यासाठी घराबाहेर पडत नाही. मी देखील नातवाच्या मालिशसाठी नागपूरला जात आहे, अशी प्रतिक्रिया कुंदा  मेश्राम यांनी दिली. 

कोरोना आणि लॉकडाऊन काळात आंदोलन, उद्रेक करता  येत नाही. त्यामुळे मनमानी निर्णय घेण्यात येत आहेत. प्लॅटफॉर्म तिकिटांची पाच पटीने भाडेवाढ करण्यात आली आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे सवलतीच्या दरात तिकीट मिळत नाही. तेजस एक्सप्रेसप्रमाणे तिकीट दर भारतीय रेल्वेमध्ये लागू करण्यात आले आहेत. पाच पटीने प्लॅटफॉर्म तिकीट दरांची वाढ करण्यात आली आहे. सवलतींच्या दरातील तिकीट देणे बंद केले आहेत. हे सर्व निर्णय मागे घेणे आवश्यक आहेत असं  उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक मनोहर शेलार म्हणालेत.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट सुरू आहे. नवनवीन नियम, अटी आणून प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकले जात आहेत. कोरोनामुळे आधीच सर्वजण आर्थिक कारणाने पिचले गेले आहेत. यात ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे जुन्या सवलतीच्या दरातील तिकीट भाडे सुरू करण्यात यावेत असं रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणालेत.

तर सेंट्रल रेल्वे मजदूर संघ सरचिटणीस प्रवीण वाजपेयी म्हणालेत की, कोरोना काळात विशेष एक्सप्रेस सोडण्यात येत आहेत. या एक्सप्रेसऐवजी पुन्हा रेग्युलर गाड्या सुरु करणे आवश्यक आहे. कोरोना विशेष ट्रेनमध्ये कोणतेही सवलत दिली गेली नाही. ज्येष्ठ नागरिक, कॅन्सर रुग्ण, इतर आजाराने बाधित असलेल्या रुग्णांना सवलतीचा प्रवास असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे विशेष ट्रेन धावू शकते, तर रेग्युलर गाड्या सुरु व्हायला पाहिजेत. भारतीय रेल्वे हि गरिबांसाठी स्वस्तात आणि वेगवान प्रवास देण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीला खासगीकरणाचे रूप देणे उचित नाही. 

महत्त्वाची बातमी : दुसऱ्या डोस घेतल्यानंतर लगेचच भिवंडीत नागरिकाचा मृत्यू, लसीनेच घेतलाय का सुखदेव यांचा बळी ?

याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क मुख्य अधिकारी शिवाजी सुतार यांनी देखील आपलं मत मांडले आहे. प्रवाशांना फक्त आरक्षित तिकीट दिली जात आहेत. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी वेगवेगळ्या सवलती ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी कोरोना काळात प्रवास टाळावा, यासाठीही तिकीट सवलत दिली गेली नाही.

crowd management or trick for privatization reactions of mumbai rail users on train and ticket rate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com