esakal | पालघरमध्ये देवीचा जागर दर्शनासाठी महिला वर्गाची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पालघरमध्ये देवीचा जागर दर्शनासाठी महिला वर्गाची गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : पालघर तालुक्यात नांदगाव येथील नंदवादेवी, केळवे येथे शितलादेवी, केळवे अंबारे येथील कालिकादेवी, माकुणसार वळवाडी येथील एकवीरा माता, सफाळे येथील कुर्ला देवी, तांदुळवाडीची वज्रेश्वरी माता, पालघरची आंबे माता, शिरगावची खांजाई देवी, वडराई माहीमची महाकाली देवी माहीमची व महिकावती देवी या मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना करण्यात आली.

आजपासूनच भक्तांसाठी मंदिरे खुली केल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पालघर तालुक्यातील केळवे येथील शितलादेवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात शेकडो लोक दर्शनासाठी येत असतात; तर याच काळात तालुक्यातील नऊ देवींचे दर्शन घेण्यासाठी महिला भाविक एकत्र येत असतात.

हेही वाचा: मुंबईत आजपासून नवरात्रीची धूम; ७४७ ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना

या काळात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंडळाच्या व्यवस्थापनाकडून कोरोना नियमांचे पालन करण्यात येत आहे.

loading image
go to top