
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चहावाला महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांची कमाई करत होता. ही कमाई चहाविक्रीतून नाही तर तिकीट विक्रीतून होत होती. चहावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा पुरवायचा. त्यानं अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करून दिली. या प्रकरणी दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी चहावाल्याला ताब्यात घेतलंय.